नगर हादरलं! सुनेने भररस्त्यात कुऱ्हाडीने वार करत सासऱ्याची केली निर्घृण हत्या; कारण ऐकाल तर व्हाल थक्क
नगर हादरलं! सुनेने भररस्त्यात कुऱ्हाडीने वार करत सासऱ्याची केली निर्घृण हत्या; कारण ऐकाल तर व्हाल थक्क Saam Tv

नगर हादरलं! सुनेने भररस्त्यात कुऱ्हाडीने वार करत सासऱ्याची केली निर्घृण हत्या; कारण ऐकाल तर व्हाल थक्क

अहमदनगर जिल्ह्यामधील जामखेड रोडवरील चिचोंडी पाटील गावामध्ये एक धक्कादायक घटना घडली

अहमदनगर : अहमदनगर Ahmednagar जिल्ह्यामधील जामखेड Jamkhed रोडवरील चिचोंडी पाटील Chichondi Patil गावामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. गावातील एका महिलेने भररस्त्यामध्ये आपल्या सासऱ्याची निर्घृण हत्या killed केली आहे. सुनेने कुऱ्हाडीने वार करत आपल्या सासऱ्याचे डोके दगडाने ठेचले आहे. मंगळवारी सकाळी घडलेल्या या घटनेमुळे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे.

या घटनेची माहिती मिळताच नगर तालुका पोलिसांनी police घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे. यावेळी पोलिसांनी आरोपी सुनेला देखील अटक arrested करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. अर्जुन गोविंद हजारे असे हत्या झालेल्या ६३ वर्षीय सासऱ्याचे नाव आहे. ते जामखेड रस्त्यावरील चिचोंडी पाटील गावामधील रहिवासी आहेत.

हे देखील पहा-

या प्रकरणी पोलिसांनी सून ज्योती अतुल हजारे हिला अटक करण्यात आली आहे. तिच्याविरोधात पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत सासरा अर्जुन हजारे हे आपल्या सुनेच्या चारित्र्यावर सतत संशय घेत असत. यामुळे सासरच्या मंडळीबरोबर आरोपी ज्योती हिचे वारंवार खटके उडत असत. घटनेच्या दिवशी मंगळवारी सकाळी देखील दोघांमध्ये परत एकदा वाद झाला होता.

नगर हादरलं! सुनेने भररस्त्यात कुऱ्हाडीने वार करत सासऱ्याची केली निर्घृण हत्या; कारण ऐकाल तर व्हाल थक्क
जावयाने सासूच्या डोक्यात फरशी घालून आणि चाकूने वार करत केली निर्घृण हत्या; कारण ऐकाल तर व्हाल थक्क

सासऱ्याने सुनेवर चारित्र्याचा संशय घेतल्याने दोघेही गावातील रस्त्यावर एकमेंकाबरोबर भांडत होते. भररस्त्यावर सुरू असलेल्या या वादातून संतापलेल्या सुनेने सासऱ्यावर थेट कुऱ्हाडीने वार केले आहेत. आरोपी सून एवढ्यावरच थांबली नाही. तर तिने रस्त्याच्या बाजूला पडलेल्या दगडाने आपल्या सासऱ्याच्या तोंडावर, डोक्यात आणि कपाळावर एका मागोमाग एक घाव घातले आहेत.

हा हल्ला इतका भयावह होता की सासरे अर्जुन हजारे हे घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात पडले होते आणि काही वेळातच त्यांचा तडफडून मृत्यू झाला आहे. या धक्कादायक प्रकरणाची माहिती मिळताच नगर तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यावर, आरोपी सुनेला घटनास्थळावरूनच अटक करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास नगर पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com