भंडारा : सासुच्या अंगावर सुनेने ओतले गरम पाणी; गुन्हा दाखल

crime
crime

भंडारा : स्वत:साठी सोन्याची नवीन अंगठी केली परंतु आपल्या मुलाला केली नाही हा राग मनात धरुन सुनेने गरम पाणी सासूच्या अंगावर टाकल्याची घटना नुकतीचे येथे घडली आहे. याबाबत सासू पुष्पा गभने यांनी त्यांची सून अलका गभने हिच्यावर भंडारा शहर पाेलिस ठाण्यात गुन्हा crime दाखल आहे. daughter-in-law-mother-fight--bhandara-crime-news-sml80

crime
टोल वसुली थांबवा अन्यथा मला थांबवावी लागेल - उदयनराजे भाेसले

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार गभने या शहरातील रामनगरातील किसान चौक परिसरात राहतात. साेन्याच्या अंगठीवरुन सासू आणि सून यांच्यात वाद झाला. या वादातून सून अलका हिने अंगावर गरम पाणी टाकले. त्यामुळे सासू पुष्पा या भाजल्या अशी तक्रार पुष्पा यांनी दिली आहे.

पुष्पा यांना भंडारा येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. सध्या पुष्पा या लाखनी गावी त्यांच्या मुलीकडे राहण्यास गेल्या आहेत. अलका यांच्या विराेधात कलम ३२४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती तपासी अधिकारी केशव नागोसे यांनी दिली.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com