Devendra Fadnavis News: 'राज्यात कुणालाही दंगली घडवू देणार नाही..' गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा

Maharashtra Politics: राहुल नार्वेकर कायद्याचा चांगला अभ्यास आहे. त्यामुळे ते दबावाला बळी पडणार नाहीत, असेही फडणवीस म्हणाले....
Devendra Fadnavis news
Devendra Fadnavis news saam tv

Pimpari Chinchwad News: " राज्यात काही लोक जाणून बुजून दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र महाराष्ट्रात कोणालाही दंगली घडवून देणार नाही आणि जे दंगली घडवण्याचा प्रयत्न करतात त्यांना अद्दल घडवणार," असा गंभीर इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

आज पिंपरी चिंचवड (Pimpari- Chinchwad) शहरातील वेगवेगळ्या विकास कामाचं उद्घाटन उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत आहे. यावेळी माध्यमांशी बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील दंगली आणि 16 आमदारांच्या अपात्रेच्या प्रश्नावर माध्यमांशी बोलताना आपलं मत व्यक्त केले आहे.

Devendra Fadnavis news
Ahmednagar clash: अकोल्यानंतर अहमदनगरमध्ये दोन गट भिडले, शेवगावमध्ये तुफान राडा, घटनेत अनेक जण गंभीर

राज्यात दोन विविध शहरांमध्ये दगडफेकीच्या घटना समोर आल्या होत्या. शनिवारी रात्री अकोल्यात (Akola) दोन गट भिडल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता अहमदनगरमध्येही दोन गटांत तुफान राडा झाला आहे. या घटनांवरुनच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इशारा दिला आहे. (Latest Marathi News)

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस...

"काहीजण राज्यात मुद्दाम राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र ते सफल होणार नाहीत, जे अशा प्रकारे दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना आम्ही सोडणार नाही," असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना दिला आहे.

"तसेच तणाव निर्माण झालेल्या दोन्ही शहरांमध्ये आता पुर्णपणे शांतता असून पोलिस सतर्क मोडवर आहेत," अशी माहितीही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी यावेळी दिली.

Devendra Fadnavis news
Nitesh Rane News : 'मविआ' त उद्धव ठाकरेंची अवस्था सरदारासारखी : नितेश राणे

नार्वेकर दबावाला बळी पडणार नाहीत..

राज्यातील सत्ता संघर्षाच्या (Maharashtra Politics) निकालानंतर ठाकरे गट आक्रमक झाला असून विधानसभा अध्यक्षांना ते पत्र पाठवणार आहेत. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी " राहुल नार्वेकर हे गेल्या कित्येक वर्षापासून कायद्याची प्रॅक्टिस करत आहेत. त्यांचा कायद्याचा चांगला अभ्यास आहे. त्यामुळे कुणी कितीही दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरी ते दबावाला बळी पडणार नाहीत," अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com