संतापजनक! उपराजधानीत रुग्णालयाच्या व्हरांड्यात महिलेची प्रसृती, बाळाचा मृत्यू
संतापजनक! उपराजधानीत रुग्णालयाच्या व्हरांड्यात महिलेची प्रसृती, बाळाचा मृत्यूSaam Tv

संतापजनक! उपराजधानीत रुग्णालयाच्या व्हरांड्यात महिलेची प्रसृती, बाळाचा मृत्यू

रुग्णालयाने तब्बल दोन तास प्रवेश नाकारला

नागपूर -  शहरातील रुग्णालयात Hospital एक संतापजनक घटना घडली आहे.  शहरातील दोन रुग्णालयाने गर्भवती महिलेला प्रसृती कळा होत असताना देखील रुग्णालयात दाखल करुन घेण्यास नकार दिल्याची माहिती समोर आली आहे. परिणामी रुग्णालयाच्या व्हरांड्यातच या महिलेची प्रसृती झाली असून यामध्ये बाळाचा मृत्यू Death झाला आहे. डागा Daga या सरकारी रुग्णालयात Government Hospital हा धक्कादायक प्रकार घडला आहे. 

२७ वर्षीय राणी वासणीक या महिलेला प्रसृती कळा व्हायला लागल्यानंतर कुटुंबीयांनी रुग्णालयात धाव घेतली. मात्र, कन्हान प्रथमिक आरोग्य केंद्र आणि कामटी उपजिल्हा रुग्णालयाने या महिलेला रुग्णालयात दाखल करुन घेण्यास नकार दिला. त्यामुळे या महिलेला नागपूर शहरातील डागा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, इथं पोहचल्यानंतर रुग्णालयाने तब्बल दोन तास प्रवेश नाकारला अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

हे देखील पहा -

दरम्यान, या प्रकरणावर आतापर्यंत रुग्णालयाकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. राणी वासणिक या मूळच्या नागपूरमधील वाडी येथील राहणाऱ्या आहेत. त्यांचे माहेर नागपूरमधील कन्हान येथील आहे. त्यामुळे गर्भवती असताना राणी आपल्या माहेरी कन्हानमध्ये गेली होती. रविवारी राणीला प्रसृती कळा जाणवायला लागल्या. तेव्हा कुटुंबियांनी त्यांना कन्हान प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र, तिथून त्यांना कामटी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यासाठी सांगण्यात आले. पण येथेही त्यांना दाखल करुन घेतले नाही.

संतापजनक! उपराजधानीत रुग्णालयाच्या व्हरांड्यात महिलेची प्रसृती, बाळाचा मृत्यू
अलिबाग मुरुड मार्गावर दरड कोसळली...

कुटुंबीयांनी त्यानंतर नागपूरमधील डागा रुग्णालयात धाव घेतली. डागा रुग्णालयातही दाखल करण्यास दोन तास उशीर केल्याचा आरोप राणीच्या कुटुंबीयांनी केला आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्येही हा धक्कादायक प्रकार दिसत आहे. रुग्णालयात गर्भवती महिलेला दाखल करण्यास नकार दिल्यामुळे जन्मापूर्वीच या चिमुकल्याची हत्या केल्याचा संताप सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. महिलेच्या कुटुंबियांनी रुग्णालयावर गंभीर आरोप केले आहेत. रुग्णालयाच्या व्हरांड्यातच प्रसृती झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या संतापजनक घटनेमुळे सरकारी रुग्णालयाच्या कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com