एका घरातून दुसऱ्या घरामध्ये अनधिकृत वीज जोडल्याने मोठा अनर्थ; घरमालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

घरगुती वापराच्या वीज मीटरमधून दुसऱ्या घरात अनधिकृत वीज जोडणी केल्याने पत्र्याच्या शेडमध्ये राहणाऱ्या भाडेकरूला विजेचा शॉक लागला होता.
Nahsik News
Nahsik NewsSaam TV

तबरेज शेख -

नाशिक: नाशिकमध्ये (Nashik) घरगुती वापराच्या वीज मीटरमधून दुसऱ्या घरात अनधिकृत वीज जोडणी केल्याने पत्र्याच्या शेडमध्ये राहणाऱ्या भाडेकरूला विजेचा धक्का बसून त्यात त्याचा मृत्यू झाल्याच्या घटना घडली होती. सदर घटना नाशिकच्या नांदूरगाव वर्षभरापूर्वी घडली होती. या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना आता न्याय मिळाला आहे.

या प्रकरणात वीज कंपनीच्या चौकशीअंती घरमालक संतोष जोशी यांच्याविरोधात केंद्रीय विद्युत प्राधिकरण सुरक्षा व वीजपुरवठा कायद्यांतर्गत प्राथमिक तपासात दोषी ठरवत, आडगाव पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकमध्ये या कायद्यांतर्गत हा पहिलाच गुन्हा दाखल झाला आहे. या संदर्भात आडगाव पोलिस (police) कर्मचारी ज्ञानेश्वर कहांडळ यांनी फिर्याद दिली होती.

पाहा व्हिडीओ -

नांदूरगाव येथील रहिवासी संतोष श्रीधर जोशी यांच्या घराला लागून असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये सुभाष रावसाहेब गायकवाड हे कुटुंबियांसोबत रहात होते. त्याचवेळी जोशी यांनी घरगुती वापराच्या वीज मीटरमधून अनधिकृतपणे घराच्या समोर असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये वीजपुरवठा सुरू ठेवला होता.

Nahsik News
Tanya Pardazi | हजारो फूटांवरुन उडी मारली, पण पॅराशुट उघडलंच नाही; २१ वर्षीय टिकटॉक स्टार तान्या परदाजीचं निधन

या शेडमध्ये अचानक वीजप्रवाह उतरल्याने या ठिकाणी राहणारे सुभाष गायकवाड यांना धक्का बसल्याने ते गंभीर जखमी झाले होते. या घटनेनंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेत गायकवाड यांचा नकळत हा शेडच्या लोखंडी खांबाला हात लागल्याने त्यांना विजेचा तीव्र झटका बसला होता आज अखेर या प्रकरणी घरमालकाला दोषी ठरविण्यात आलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com