दुर्दैवी : विद्युत खांबाजवळ काम करताना शॉक लागल्याने वीज कर्मचाऱ्याचा मृत्यू

सोलापूर शहरातील महावितरणच्या 'क' उपविभागामध्ये आज मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीचे कामे करत असताना दोन वीज कर्मचाऱ्यांना विजेचा धक्का बसला.
दुर्दैवी : विद्युत खांबाजवळ काम करताना शॉक लागल्याने वीज कर्मचाऱ्याचा मृत्यू
Solapur Newsविश्वभूषण लिमये

सोलापूर : सोलापूर शहरातील महावितरणच्या 'क' उपविभागामध्ये आज मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीचे कामे करत असताना दोन वीज कर्मचाऱ्यांना विजेचा धक्का बसला. यामध्ये महावितरणच्या (MSEDCL) एका वीज कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान दुदैवी मृत्यू झाला आहे. तर कंत्राटी कर्मचारी जखमी असून त्याची प्रकृती स्थिर आहे. रब्बानी अहमद शेख असे दुदैवी मृत्यू झालेल्या महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञाचे नाव आहे.

सोलापुरातील (Solapur City) रामलाल चौक शाखे अंतर्गत वरिष्ठ तंत्रज्ञ रब्बानी अहमद शेख आणि कंत्राटी कर्मचारी अझहर चाँद तांबोळी हे दोघे सिव्हील वीज उपकेंद्रातून निघणाऱ्या ११ के.व्ही. रामलाल चौक फिडरवर रेल्वे स्टेशन परिसरातील एका ठिकाणी विजेच्या तारांना लागणाऱ्या फांद्या छाटण्याचे काम करत होते. याकरिता त्यांनी महावितरणच्या शिडीगाडीची मदत घेतली होती. तरीही काम करताना अचानक लागलेल्या शॉकमुळे ते जखमी झाले होते.

Solapur News
१६ वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, गरोदर राहिल्याचं कळताच प्रियकराने तिला सोडलं

या दोन्ही कर्मचाऱ्यांना (Electricity workers) तातडीने सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. गंभीर जखमी झालेले महावितरणचे कर्मचारी रब्बानी अहमद शेख यांना उपचारास प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तर कंत्राटी उपचारास प्रतिसाद देत असून कर्मचारी तांबोळी यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितलेलं आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.