लातूरच्या देवणी येथील ST कर्मचाऱ्याचा नैराश्यातून कोसळल्याने दुर्दैवी मृत्यू

अखेर त्यांचा लातूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान दुर्दैवी निधन झाले.
लातूरच्या देवणी येथील ST कर्मचाऱ्याचा नैराश्यातून कोसळल्याने दुर्दैवी मृत्यू
लातूरच्या देवणी येथील ST कर्मचाऱ्याचा नैराश्यातून कोसळल्याने दुर्दैवी मृत्यूदीपक क्षीरसागर

दीपक क्षीरसागर

लातुर जिल्ह्यातील देवणी येथील रहिवासी असलेले निलंगा एस टी आगारातील कर्मचारी 38 वर्षीय शिवकुमार भानुदास शिरापुरे हे एस टी कर्मचाऱ्यांच्या उद्भवलेल्या परिस्थितीच्या नैराश्यातून जमीनीवर कोसळल्याने झालेल्या दुखापतीवर गेल्या १० दिवसापासून सुरू असलेली मृत्यूशी झुंज आज संपली. अखेर त्यांचा लातूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान दुर्दैवी निधन झाले.

हे देखील पहा-

मृत शिरापुरे हे तुटपुंज्या पगारीवर काम करतं. १० व्यक्ती असेलेल्या कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर होती व ते कुटुंबात एकमेव कमावते असल्याने सद्यस्थितीत एस. टी. कर्मचाऱ्यांचा संप आणि होत असलेले कर्मचारी निलंबित यासह उलटसुलट सुरू असलेल्या चर्चा यामुळे आता माझे पुढे कसे या नैराश्यातून ते १० दिवसापूर्वी घरी ते कोसळल्याने त्यांच्या डोक्याला मार लागले होते. त्यांच्यावर लातूर येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

लातूरच्या देवणी येथील ST कर्मचाऱ्याचा नैराश्यातून कोसळल्याने दुर्दैवी मृत्यू
Surrogacy: ज्याद्वारे प्रीती झिंटा बनली आई; जाणून घ्या सरोगसी म्हणजे काय?

मृत शिवकुमार शिरापुरे हे सन २००९ मध्ये सहाय्यक कारागीर बहु व्यवसाय या पदावर पनवेल आगारात नोकरीवर रुजू झाले. ते गेल्या चार वर्षांपूर्वी लातूर जिल्ह्यात बदली होऊन आले होते. ते तीन महिन्यापूर्वीच निलंगा आगारात बदली होऊन आले होते. मृत शिरापुरे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. मयतावर शनिवारी दुपारी देवणी येथील सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com