...तर ठार मारु; उद्धव ठाकरेंच्या गटातील शहरप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी

प्रसाद सावंत यांच्यावर मागील महिन्यात कर्जतमध्ये जीवघेणा हल्ला देखील झाला होता.
Shivsena News
Shivsena NewsSaam TV

सचिन कदम -

रायगड : माथेरान शिवसेना शहरप्रमुख आणि माजी नगरसेवक प्रसाद सावंत (Prasad Sawant) यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रसाद सावंत हे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे शहरप्रमुख आहेत. सावंत यांच्यावर मागील महिन्यात कर्जतमध्ये (Karjat) जीवघेणा हल्ला देखील झाला होता.

प्रसाद सावंत यांना आता आलेली धमकी देणारा व्यक्ती हा हिंदी भाषेतून बोलत होता शिवाय, 'आपली नेतागिरी माथेरान मध्येचकर, कर्जतमध्ये दिसू नकोस, दिसल्यास ठार मारु' अशी धमकी सावंत यांना देण्यात आली आहे.

Shivsena News
संजय राऊतांवरील कारवाईनंतर मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले, तो भोंगा आता...

दरम्यान, मागील महिन्यात सांवत यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. त्या मारहाण प्रकरणातील आरोपी आठ आरोपी मोकाट असतानाच धमकीचा फोन आल्याने सांवत यांच्या धोक्यात वाढ झाली असल्याचं बोललं जात आहे. शिवाय या प्रकरणातील फोनची ऑडियो क्लिप व्हायरल झाली असून माथेरान पोलिस ठाण्यात (Matheran Police Station) या धमकी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com