अबब... भंडाऱ्यातल्या व्यापाऱ्यांच्या डोक्यावर 100 कोटींचे कर्ज !

5 दिवस सकाळी 7 ते 4 ह्या वेळेत व्यवसाय करून भंडारा जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना फेड़ायचे आहे. दुसऱ्या लॉकडाउनने भंडारा जिल्ह्यातील व्यापाऱ्यांवर 100 कोटींचे कर्ज झाले आहे.
अबब... भंडाऱ्यातल्या व्यापाऱ्यांच्या डोक्यावर 100 कोटींचे कर्ज !
अबब... भंडाऱ्यातल्या व्यापाऱ्यांच्या डोक्यावर 100 कोटींचे कर्ज ! अभिजीत घोरमारे

अभिजीत घोरमारे

भंडारा - कोरोनाच्या Corona दुसऱ्या लाटेने भंडारा Bhandara जिल्ह्यात अक्षरक्षा थैमान घातल्यानंतर कोरोना लाट ओसरत असली तरी त्याचे विपरीत परिणाम आता समोर येऊ लागले आहे. अनेक लोकांच्या बळी घेतल्या बरोबर जिल्ह्यातील व्यापाऱ्यांची Traders आर्थिक कंबर ही ह्या कोरोनाने तोड़ल्याचे चित्र स्पष्ट दिसु लागले आहे. जिल्ह्यातील व्यापाऱ्यांवर तब्बल 100 कोटी कर्ज झाले असून जिल्हा प्रशासानाद्वारे निर्धारित केलेल्या दुकानाच्या वेळेत व्यवसाय करत हे कर्ज फेडायची तारेवरची सर्कस जिल्ह्यातील व्यापारी करत आहे.

हे देखील पहा-

भंडारा Bhandara जिल्ह्यात कोरोना ची दूसरी लाट ओसरत असली तरी भंडारा जिल्हा प्रशसानाद्वारे लावण्यात अनेक कड़क निर्बंध लावण्यात आले आहेत. ह्या कड़क निर्बधाचे पालन करत जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना 5 दिवस सकाळी 7 ते 4 ह्या वेळेत दुकाने सुरु ठेवत त्यात व्यवसाय करावा लागत आहे.

अबब... भंडाऱ्यातल्या व्यापाऱ्यांच्या डोक्यावर 100 कोटींचे कर्ज !
अभ्यासाचं गाव तडवळे : जिल्ह्यातील पाहिलं अन् राज्यातील दुसरं !

त्यात व्यापाऱ्यांकड़ून उधारी वर आनलेला माल, बैक कर्ज, विज बिल, टैक्स व दुकान किराना, गोदाम भाडे ईत्यादी अनेक कर्ज पकडून 100 कोटी चे कर्ज फेडायचे आहे. हे फेडत असतांना कामगारांचे वेतन ही द्यायचे आहे. अशा सर्व विवंचनेत जिल्ह्यातील व्यापारी व्यवसाय करत असून निर्धारित वेळेत काम करत कर्ज-वेतन-नफा ह्याचे ताळमेळ लावण्यात जिल्ह्यातील व्यापऱ्यांची दमछाक होत आहे. त्यामुळे इतरांप्रमाणे आम्हाला ही मदत करण्याची मागणी व्यापऱ्यांकडून जोर धरत आहे.

Edited By-Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com