शेकापशी युती पाच वर्षांसाठी पुढील निर्णय परिस्थितीनुसार घेणार! तटकरे यांचा सूचक इशारा

2017 साली झालेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप यांची निवडणूकपूर्व आघाडी झाली होती.
शेकापशी युती पाच वर्षांसाठी पुढील निर्णय परिस्थितीनुसार घेणार! तटकरे यांचा सूचक इशारा
सुनील तटकरे SaamTvNews

-- राजेश भोस्तेकर

रायगड : रायगड जिल्हा परिषदेत शेकापशी असलेली आघाडी पाच वर्षांसाठी आहे. आगामी  स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत युतीबाबत परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाईल, असा सूचक इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी दिला आहे. अलिबाग येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत खासदार सुनील तटकरे बोलत होते.

हे देखील पहा :

2017 साली झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप यांची निवडणूकपूर्व आघाडी झाली होती. 2019 साली विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. त्यानंतर राज्यातील समीकरणे बदलली. रायगड जिल्हा परिषदेत देखील महाविकास आघाडी सरकारमध्ये समाविष्ट असलेल्या पक्षांची सत्ता यावी यासाठी शिवसेनेच्या नेत्यांनी चर्चा केली. परंतु शेकापशी आमची असलेली आघाडी पाच वर्षांसाठी आहे. ती तोडणार नाही असे मी त्यांना सांगितले. त्यामुळे जिल्हा परिषदेत शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आहेत, असे तटकरे म्हणाले.

सुनील तटकरे
तुला मी पाहिजे का पैसे? प्रेयसीने पाजले उंदीर मारायचे औषध! प्रियकराने उसने दिले होते लाखो रुपये
सुनील तटकरे
समृद्धी जीवन मल्टिस्टेट घोटाळा प्रकरणात बीड पोलिसांनी महेश मोतेवारला ठोकल्या बेड्या!

राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या  निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये समाविष्ट असलेल्या घटक पक्षांची आघाडी व्हावी अशी चर्चा सुरू आहे. वरिष्ठ पातळीवर याबत निर्णय घेतला जाईल. कदाचित स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेण्यास सांगितले जाईल. रायगड जिल्हा परिषदेत शेकापशी आमची आघाडी आहे. ती 2022 पर्यंत आहे. पुढील निर्णय त्यावेळच्या परिस्थती नुसार घेतला जाईल, असे सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले. खासदार सुनील तटकरे यांच्या या सूचक इशाऱ्याने आगामी काळात शेकाप हा आघाडी सोबत असणार की स्वतंत्र लढणार हे पुढील काळात स्पष्ट होणार आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.