Mahavikas Aghadi News : जालना जिल्ह्यासह मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा : 'मविआ' च्या शिष्टमंडळाची मागणी

शेतक-यांना दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घ्यावा अशी मागणी मविआच्या नेत्यांनी केली आहे.
Jalna, Rajesh Tope, drought
Jalna, Rajesh Tope, droughtsaam tv

Jalna News : जालना जिल्हा दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून जाहीर करा अशी मागणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज (साेमवार) मविआच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांच्याकडे केली आहे. याबाबत आमदार राजेश टोपे, कैलास गोरंट्याल यांच्यासह माजी आमदारांच्या शिष्टमंडळाने जालना जिल्हाधिकारी यांना निवेदन देत प्रशासनाच्या मार्फत मुख्यमंत्र्याकडे मागणी केल्याचे मविआच्या नेत्यांनी नमूद केले. (Maharashtra News)

Jalna, Rajesh Tope, drought
Ganesh Festival 2023 : कार्यकर्त्यांनाे ! लेझर शोला बंदी, सार्वजनिक गणेशाेत्सव मंडळांना कोल्हापुर पाेलिसांचा कारवाईचा इशारा

छत्रपती संभाजीनगर (chhatrapati sambhaji nagar) येथे नुकत्याच झालेल्या मंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठवाड्याला नुसती पॅकेजची घोषणा करण्यात आली. या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दुष्काळाबाबत कुठलीच घोषणा न झाल्याने जालना जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या वतीने आमदार राजेश टोपे, आमदार कैलास गोरंटयाल यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील महाविकास आघाडीचा वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.

Jalna, Rajesh Tope, drought
Navi Mumbai News : अनंत चतुर्दशी, ईद-ए-मिलाद एकाच दिवशी; धर्मगुरूंच्या निर्णयाचे नवी मुंबई पोलिसांकडून स्वागत

जिल्ह्यात अर्ध्यावर पावसाळा संपत आलेला असतानाही जिल्ह्यात अत्यल्प पाऊस पडल्याने खरीप पिकासह पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारने जालना जिल्हा हा दुष्काळग्रस्त जिल्हा (declare drought in jalna demands maha vikas aghadi) जाहीर करावा अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.

त्याचबरोबर जिल्ह्यात चारा छावण्या सुरू कराव्यात, शेतकऱ्यांची वीज वसुली तात्काळ थांबवावी, पाणीटंचाईग्रस्त गावांना वेळेप्रमाणे पाणीपुरवठा सुरू करावा इत्यादी मागण्या निवेदनातून नमूद करण्यात आल्या आहेत.

पॅकेजच्या घोषणा हवेत विरू नये : राजेश टाेपे

छत्रपती संभाजीनगर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जाहीर करण्यात आलेल्या पॅकेज बाबत बोलताना राजेश टोपे यांनी जे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. त्याचा बजेटमध्ये किती प्राेव्हिजन करण्यात आले आहे. किती बजेट वाटप होणार आहे. आकडे मोठे मोठे असले तरी नुसती घोषणा करून चालणार नाही. त्या घोषणाची तात्काळ अंमलबजावणी झाली पाहिजे. घोषणा हवेत विरू नये अशी मिस्कल टीकाही टोपेंनी केली.

Edited By : Siddharth Latkar

Jalna, Rajesh Tope, drought
Samruddhi Mahamarg Accident News : समृद्धी महामार्गावरील अपघातात मध्यप्रदेशाच्या महिला पाेलीस अधिकारी गंभीर जखमी

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com