Nashik News : तालुका दुष्काळी जाहीर न झाल्यास न्यायालयात जाणार : आमदार सुहास कांदे

आज (बुधवार) आमदार सुहास कांदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
Mla Suhas Kande
Mla Suhas Kandesaam tv

- अजय सोनवणे

Nashik News : नांदगाव तालुक्यात दुष्काळी परिस्थिती आहे. 36 पैसे आणेवारी लावली गेलेली असताना नांगदाव दुष्काळी तालुका जाहीर होत नसेल तर थेट न्यायालयात जावे लागेल असा इशारा आमदार सुहास कांदे यांनी (mla suhas kande) दिला आहे. (Maharashtra News)

Mla Suhas Kande
Maharashtra : ओ साहेब पोतं उचलायला हात लावता का? जिल्हाधिका-यांचा फाेटाे Social Media त Viral

नाशिक जिल्ह्यात यंदा पूर्व भागात पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील पिके हातची गेली आहेत. नांदगाव तालुक्यात जून ते सप्टेंबर दरम्यान इतर तालूक्याच्या तुलनेत केवळ 64.3 टक्के पाऊस झाल्याची नोंद झालेली असताना ट्रिगर 1 आणि 2 मध्ये नांदगाव तालुक्याचा समावेश झाला नाही.

Mla Suhas Kande
Neelam Gorhe On Nitesh Rane : नितेश राणेंच्या 'त्या' आरोपावर निलम गोऱ्हेंचे चोख प्रत्युत्तर

त्यामुळे नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास कांदे संतप्त झाले आहेत. तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असूनही जर 36 पैसे आणेवारी लावली गेलेली असताना दुष्काळी तालुका जाहीर होत नसेल तर थेट न्यायालयात जाण्याचा इशारा आमदार कांदे यांनी दिला आहे.

आजी माजी पालकमंत्री यांचा मालेगाव व येवला तालुका ट्रीगर 2 मध्ये दाखविला जातो मग माझ्या मतदारसंघात कमी पाऊस होऊन तो ट्रिगर 1,ट्रिगर 2 मध्ये बसत नाही का असा सवाल आमदार कांदे (suhas kande) यांनी उपस्थित केला आहे.

शासनाने तालुका दुष्काळी जाहीर केला नाही तर न्यायालयात दाद मागू असा इशारा देत या अगोदर आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना भेटणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Mla Suhas Kande
Nira Bhima Sugar Factory Auction : 'निरा- भीमा'चा लिलाव हाेणार, हर्षवर्धन पाटलांसह शेतकरी अडचणीत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com