अहो आश्चर्यम! कोरोना मुळे मागील दीड वर्षात जन्मदरात कमालीची घट

कोरोनामुळे जन्मदरात कमालीची घट झाल्याची माहिती गोंदियातून समोर येत आहे. जन्माला येणाऱ्या बाळास कोणताही धोका उद्भवू नये यासाठी विवाहित जोडपी काळजी घेत आहेत.
कोरोना मुळे जन्मदरात कमालीची घट

कोरोना मुळे जन्मदरात कमालीची घट

SaamTv

अभिजीत घोरमारे

गोंदिया - कोरोना संसर्गाच्या भीतीने गोंदियाकरांनी पाळणा लांबवल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. गोंदियाकरांनी कोरोनाची चांगलीच धास्ती घेतली असून कोरोना काळात जन्मदराचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटले आहे. कोरोनामुळे नवीन पाहुणा घरात येवू नये व त्यालाही कोरोना सारखा आजार होऊ नये म्हणून लोकांनी खूप काळजी घेतली आहे. Decrement In Birth Rate Due To Corona

कोरोना काळात अचानक वाढलेली बाधितांची संख्या, झालेले मृत्यु, व उपचार घेण्याकरता झालेली तरांबळ गोंदियाकरांनी जवळून बघितली असून कोरोनाचे दाहक वास्तव देखील अनुभवले आहे. कोरोनाच्या काळातही लग्न समारंभ झाले खरे; मात्र नवीन लग्न झालेल्या जोडप्यांनी तसेच इतर जोडप्यांनी कोरोना काळात आपली अडचण होऊ नये म्हणून म्हणून काळजी घेत पाळणा लांबणीवर केला आणि त्याचाच परिणाम म्हणून गोंदिया जिल्ह्यात जन्मदर कमालीचा घटला आहे.

जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त आकडेवारीनुसार गोंदिया जिल्ह्यात 2019-2020 साली 17 हजार 305, 2020-2021 साली 15 हजार 982 अपत्यांच्या जन्माची नोंद झाली असुन मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी 1 हजार 323 कमी बालके जन्माला आली आहेत. उलट 2021- 2022 या चालू वर्षात आतापर्यंत केवळ 1 हजार 185 बालकांच्या जन्माच्या नोंदणी झाल्या आहेत.

<div class="paragraphs"><p>कोरोना मुळे जन्मदरात कमालीची घट</p></div>
मनसुख हिरेनच्या डायटम रिपोर्टबाबत संशय; हत्येनंतरचं मनसुखला खाडीत फेकले

तर वर्षाच्या तुलनेत मागील दीड वर्षात कमी बालके जन्माला आली आहेत. यात प्रमुख कारण म्हणजे अनेकांना कोरोनाची चांगलीच धास्ती बसली असून काहींनी लग्न देखील पुढे ढकलले आहे तर काहींनी लग्न केली असली तरी पाळणा लांबविला आहे.

जन्मदराची आकडेवारी -

वर्ष जन्मदर

2018-19 17,332

2019-20 17,305

2020-21 15,982

2021-22 1185

गोंदिया जिल्ह्यात आता पर्यंत तब्बल 41 हजार 061 कोरोना रुग्ण आढळले असून तब्बल 697 बाधितांचा कोरोनाने बळी घेतला आहे. कोरोनाच्या उपचारासाठी आलेला खर्च, बेड मिळविण्यासाठी झालेली तारांबळ, औषधांचा झालेला तुटवडा आदी कटु अनुभव बघता कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेने गोंदियाकरांना चांगलेच धास्तावुन सोडले आहे.

त्यातूनच गोंदिया जिल्ह्यात जन्मदरात कमालीची घट पहायला मिळत आहे. त्यातच आता तर संभावित तिसरी लाट चक्क चिमुकल्यांना प्रभावित करणाऱ असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे गोंदियाकर परत पाळना लांबविन्याबाबत काय निर्णय घेतात यावर प्रशासनाचे लक्ष लागले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com