Deepak Kesrkar: दीपक केसरकरांकडून अजित पवारांचे तोंडभरून कौतुक ; उद्धव ठाकरेंना आत्मपरीक्षणाचा सल्ला

साईबाबांकडे काही मागण्याची गरज पडत नाही ते सर्व काही देतात, अशी प्रार्थना साईचरणी केल्याचे केसरकर म्हणाले.
Deepak Kesarkar
Deepak KesarkarSaam TV

सचिन बनसोडे

Deepak Kesrkar: राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर नवीन वर्षानिमित्त साईचरणी लीन झाले आहेत. साईबाबांकडे काही मागण्याची गरज पडत नाही ते सर्व काही देतात, अशी प्रार्थना साईचरणी केल्याचे केसरकर म्हणाले. तर अजित पवारांचे तोंडभरून कौतुक करत उद्धव ठाकरे यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिपक केसरकर यांनी दिला आहे. (Latest Deepak Kesarkar News)

अजित पवार यांनी संभाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपती संभाजी महाराज हे धर्मरक्षक आणि स्वराज्यरक्षक देखील आहेत. त्यांनी यातना सोसल्या मात्र धर्म नाही बदलला. शब्दछल करण्यात काही महत्व नाही. विरोधी पक्षनेते अजित पवार हे बाहेरून कठोर असले तरी त्यांचं मन मात्र निर्मळ आहे. बोलताना फटकळ बोलतीत मात्र विरोधी पक्षनेता कसा असावा तर अजितदादांसारखा असावा, अशा शब्दांत दीपक केसरकर यांनी अजित पवारांचं कौतुक केलंय.

Deepak Kesarkar
Ajit Pawar यांच्या 'त्या' वक्तव्यावरून पुन्हा नवा वाद? भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचा विरोध | SAAM TV

तसेच उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, मला आदर असून कटुता कमी करणे उद्धवजींच्या हातात आहे. जेव्हा घर पेटते तेव्हा आधी आग विजवावी लागते. कशामुळे लागली ते नंतर बघू अगोदर आपण आपलं घर सुरक्षित ठेवू असं मी उद्धवजींना बोललो होतो. मला ते बोलले त्याचं दु:ख वाटलं नाही पण जे काही माध्यमात दाखवलं गेलं त्यामुळे भावना दुखावल्या गेल्या.

Deepak Kesarkar
Deepak Kesarkar : शिक्षणमंत्री केसरकर यांनी IAS अधिकाऱ्याला भर सभेत झापले ; पाहा व्हिडीओ

प्रेमाचा आदर आहे तो कमी होता कामा नये. मी सगळ्यांचे उत्तर देईल. त्यांच्या आजूबाजूचे लोक जे सांगतात त्यावर ते मत बनवत असतात. पैशाने प्रेम विकत घेता येत नाही तर प्रेमाने मन जिंकाव लागतं. शिंदेंनी ४० आमदारांची मने जिंकली. निश्चित काहीतरी घडलं त्यामुळे अनेकजण पक्ष सोडून गेले. मी जसं आत्मपरिक्षण केलं तसं उद्धवजींनी करावं, असा सल्ला केसरकर यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com