मनोधैर्य खचल्यानं दीपाली चव्हाण यांची आत्महत्या !

वनखात्यानं गठीत केलेल्या चौकशी समितीचा अजब निष्कर्ष
मनोधैर्य खचल्यानं दीपाली चव्हाण यांची आत्महत्या !
मनोधैर्य खचल्यानं दीपाली चव्हाण यांची आत्महत्या !Saam Tv

नागपूर - मेळघाटच्या हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांचे मनोधैर्य खचले म्हणून तिने आत्महत्या केली, असा अजब निष्कर्ष वनखात्यानं गठित केलेल्या चौकशी समितीनं दिला आहे. समितीचे अध्यक्ष एम.के. राव यांनी सेवानिवृतीच्या शेवटच्या दिवशी हा निष्कर्ष या अहवालाच्या माध्यमातून मांडला आहे. या निष्कर्षांमुळे राज्यभर संतापाची लाट आहे. मात्र, हा कथित अहवाल अंतिम नाही. 31 ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत समितीने अंतिम अहवाल सादर केलेला नाही, अशी माहिती पुढे आली आहे.

हे देखील पहा -

मेळघाटच्या हरीसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी 25 मार्च रोजी हरिसाल येथील शासकीय निवासस्थानी रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून आत्महत्या केली होती. वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली. या प्रकरणाने राज्यभर खळबळ उडाली होती. यानंतर वनखात्याने अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.के. राव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली.

मनोधैर्य खचल्यानं दीपाली चव्हाण यांची आत्महत्या !
अमृता वहिनी घेऊन आल्या 'गणेश वंदना'... (पहा व्हिडिओ)

एम.के. राव यांनी निवृत्तीच्या दिवशी म्हणजेच 31 ऑगस्ट 2021 रोजी स्वंतत्ररीत्या अहवाल तयार करून तो प्रमुख पी. साईप्रसाद यांच्याकडे सादर केला. या अहवालात त्यांनी दीपाली चव्हाण यांचे मनोधैर्य खचले म्हणून तिने आत्महत्या केली, असा अजब निष्कर्ष काढला. यावर राज्यभर संताप आणि आरोप होऊ लागले आहेत. वादग्रस्त अहवाल असल्यामुळे या अहवालात समितीमधील एकाही सदस्याची स्वाक्षरी नाही, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्य सरकार आता या अहवालाची दखल घेऊन यावर निर्णय घेते हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com