
कल्याण : शिवसेना नेत्या दीपाली सय्यद या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेमुळे चर्चेत आहे. आज कल्याणमध्ये दीपाली सय्यद यांनी मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना मोलाचा सल्ला दिला आहे. आताचं राजकारण सूडबुद्धीने चालू आहे. त्यामुळे सूडाच्या राजकारणापासून आपल्याला सांभाळून चाललं पाहिजे. राजकारणामधील काही डावपेच असतील ते शिकून घेणं गरजेचं असतं,असं सय्यद यांनी सांगितले. दीपाली सय्यद (Deepali sayyad) या कल्याण पूर्व येथे माजी नगरसेवक रमेश जाधव यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी आल्या होत्या. ( Maharashtra Politics News In Marathi )
भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र देत मंत्री जितेंद्र आव्हड, आमदार यशोमती ठाकूर आणि आमदार सुहास कांदे यांच्या मतदानाला आपेक्ष घेतला. यावर शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी कल्याणमध्ये वक्तव्य केले आहे.सय्यद यांनी सांगितले की,आव्हाड साहेबांनी देखील हेच सांगेल की राजकारणामधील काही डावपेच असतील ते शिकून घेणं गरजेचं असतं.'.
'नक्कीच काय खरं आहे काय खोटं आहे. कोण बरोबर बोललं किंवा काय आहे आतमध्ये ते त्यांनाच ठाऊक.पण जर अशा पद्धतीने काय झालं असेल तर आव्हाड साहेबांनी सांभाळून चाललं पाहिजे.कारण काही नियम आणि अटी असतात त्याच्यामुळे आपल्याला काही परिणाम होऊ नये.कारण आता जे राजकारण होतंय सुडबुद्धीचं राजकारण आहे. सुडाच्या राजकारणापासून आपल्याला सांभाळून चाललं पाहिजे. त्यामुळे असं होता कामा नये', असंही सय्यद पुढे म्हणाल्या.
दीपाली सय्यद यांची नुपूर शर्मांवर प्रतिक्रिया
'भारतामध्ये वेगवेगळे धर्म आहे. त्याच्यावर काहीही बोलणं त्याच्यावर टिप्पणी करणं हे कितपत बरोबर आहे. ते बरोबर नाही. महाराष्ट्रामध्ये पण देखील कित्येक प्रवक्ते, विरोधीपक्ष नेते आहेत तेही अशा पध्दतीने वक्तव्य करतात.ते कुठेना कुठे थांबलं पाहिजे. कारण अशा पद्धतीने लहान लहान मुलांच्या डोक्यात आपण काय टाकतोय ?, काय देतोय समाजला हे अशा लोकांना कळलं पाहिजे', असे दीपाली सय्यद म्हणाल्या.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.