मिरजेत अज्ञात वाहनाने ठाकरल्याने हरीण जागीच ठार...

सांगलीच्या मिरज बेडग रस्त्यावर बस्वराज कोरे यांच्या शेता जवळ अज्ञात वाहनाने ठोकरल्याने हरीण जागीच ठार झाले आहे.
मिरजेत अज्ञात वाहनाने ठाकरल्याने हरीण जागीच ठार...
मिरजेत अज्ञात वाहनाने ठाकरल्याने हरीण जागीच ठार...विजय पाटील

सांगली - सांगलीच्या Sangli मिरज Miraj बेडग रस्त्यावर बस्वराज कोरे यांच्या शेता जवळ अज्ञात वाहनाने ठोकरल्याने हरीण जागीच ठार झाले आहे. सामाजिक कार्यकर्ते गणेश पुणेकर Ganesh Punekar हे पहाटे पाच वाजता या रस्त्याने फिरायला जात असताना त्यांना रस्त्यावर हरीण मरून पडलेले दिसले. इतर वाहनाखाली चिरडू नये यासाठी गणेश पुणेकर यांनी त्या हरणाचा मृतदेह रस्त्याकडेला बाजूला घेऊन पाल्याने झाकून ठेवले होते. तात्काळ त्यांनी वनविभागाला माहिती दिली. वनविभागाचे अधिकारी यांनी घटनास्थळी येऊन हरणाचा मृतदेह ताब्यात घेतला आहे.

हे देखील पहा -

हे हरीण नर असून या भागात पहिल्यांदा आढळून आले आहे. या राज्य महामार्गाचे काम सुरू आहे. या रस्त्याने मुरूमचे ट्रक रस्त्याने वेगाने येजा करत असतात. यातील एका ट्रकने ठोकरल्याने हे हरण मेल्याचा प्राथमिक अंदाज वन विभागाने वर्तवला आहे. मिरज शहराच्या हद्दीत पहिल्यांदा हरण पाहायला मिळाले आहे. अज्ञात वाहनावर गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com