देहूत उद्या ३५ केंद्रावर मतदान; पाेलिस बंदाेबस्तात EVM रवाना

आचारसंहिता भंग करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी एक स्वतंत्र पथक नेमण्यात आले आहे.
देहूत उद्या ३५ केंद्रावर मतदान; पाेलिस बंदाेबस्तात EVM रवाना
evm machine for dehu election

मावळ (maval) : देहू (dehu) नगरपंचायतीची पहिलीच निवडणूक (nagarpanchayat election) उद्या (मंगळवार) पार पडणार आहे. त्यासाठी आज (साेमवार) निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात सर्व कर्मचारी दाखल झाले हाेते. सर्व कर्मचाऱ्यांनी निवडणुकीचे (election) साहित्य ताब्यात घेतले आहे.

उद्या एकूण पस्तीस मतदान केंद्रावर मतदान (voting) पार पडणार आहे. त्याचीच लगबग सध्या देहूनगरीत (dehu) पहायला मिळत आहे. निवडणूक (election) निर्णय अधिकारी कार्यालयातून साहित्य घेतल्यानंतर सर्व कर्मचारी नेमून दिलेल्या ठिकाणी रवाना झाले.

evm machine for dehu election
सर्वसामान्य कुटुंबातील स्त्रीचा काय मान ठेवलात? उदयनराजेंना सवाल

ही पहिलीच निवडणूक असल्याने पोलिसांचा (police) मोठा फौजफाटा देहूत तैनात करण्यात आला आहे. मतदाना दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक पोलिस बंदोबस्त आहे. मतदान केंद्रावरील कर्मचारी ईव्हीम मशीन घेऊन (evm machine for dehu election) रवाना होत असताना प्रत्येक बस बरोबर देखील पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतदान केंद्रावर देखील आजपासून पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. उद्या होणाऱ्या मतदानासाठी एकूण ३ पोलिस निरीक्षक, १४ सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक आणि ७३ अंमलदारांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी या निवडणुकीसाठी करण्यात आली आहे. आचारसंहितेचा भंग जर केला तर त्याच्यावर ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं प्रशासकीय अधिकारी संजय असोले (निवडणूक अधिकारी) यांनी स्पष्ट केले.

आचारसंहिता भंग करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी एक स्वतंत्र पथक नेमण्यात आले आहे. त्यात दोन अधिकारी आणि सहा अंमलदार आहेत अशी माहिती देहूरोड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रावसाहेब जाधव यांनी दिली.

edited by : siddharth latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com