रायगड: भारत सरकारची गाडी वापरून JSW स्टील कंपनीच्या अधिकाऱ्याकडे खंडणीची मागणी !

चौघांविरोधात वडखळ पोलिसांत गुन्हा दाखल
भारत सरकारची गाडी
भारत सरकारची गाडीराजेश भोस्तेकर

राजेश भोस्तेकर

रायगड : भारत सरकारचे (Government Of India) अधिकारी असल्याचे भासवून पेण (Pen) तालुक्यातील डोलवी येथील जेएसडब्ल्यू स्टील कंपनीच्या अधिकाऱ्याला शिवीगाळ करुन दहा लाख रुपयेची खंडणी (Ransom) मागणी करणाऱ्या चौघां जणाविरोधात वडखळ पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Raigad Crime News)

डोलवी येथील जेएसडब्ल्यू स्टील कंपनीच्या धरमतर रोड येथील कार्यालयात गुरुवारी सकाळी गणेश पोळ, रा. चेंबूर-मुंबई, जीवन महापुरे, रा. राजाराम पुरी, कोल्हापूर, महेंद्र बनसोडे रा. डेरवली, पनवेल यांनी आपण केंद्र शासनाचे शासकीय अधिकारी असल्याचे अधिकाऱ्याला सांगितले. या बनावट अधिकाऱ्यांसोबत आलेल्या मुरलीधर पाटील, रा. बहिरीचा पाडा, यांनी अलिबाग धरमतर-मानकुळे खाडीत कंपनीचा बेकायदेशीर सुरु असलेला व्यवहार बंद करण्या संदर्भात सकाळी भारतीय राजमुद्रा असलेल्या लेटर पॅड वर अर्ज दिला होता.

भारत सरकारची गाडी
लातूर: महिला पोलिसाचा दुर्गावतार; दहशत पसरवणाऱ्या गुंडाची पोलीस ठाण्यापर्यंत वरात !

"हे प्रकरण मिटवायचे असेल...";

अर्ज सकाळी दिल्यानंतर सायंकाळी पुन्हा ही भामटे कंपनी जेएसडब्लू कंपनी (JSW Steel Company) कार्यालयात येऊन दिलेल्या अर्जावर काय भूमिका घेतलीत याबाबत कंपनीचे पीआरओ असिस्टंट मॅनेजर मंगेशकुमार थत्ते यांना विचारणा केली. थत्ते यांनी याबाबत बोलणी सुरू असताना चौकडीने त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. "हे प्रकरण मिटवायचे असेल तर दहा लाख रुपये दे, नाहीतर आताच तुला मारून धरमतर खाडीत टाकतो, तुझी कंपनी बंद करतो", अशी धमकी या भामट्यानी दिली. (Raigad News Updates)

हे देखील पहा-

भारत सरकारच्या नावाची बनावट पाटी;

या बाबत मंगेशकुमार थत्ते यांनी कंपनीचे सिक्युरिटी अधिकारी मंगेश नायगम व सुरेश कुमार याच्या सोबत जाऊन वडखळ पोलिसांत तक्रार दाखल केली. वडखळ पोलिसांनी या चौघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता भामटे असल्याचे निष्पन्न झाले. भारत सरकारच्या नावाची बनावट पाटी असलेली क्वालिस गाडी तसेच बनावट लेटर हेडसह ताब्यात घेतले. चौघा आरोपीवर वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. वडखळ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार अधिक तपास करीत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com