Nagpur News: कारागृहात तृतीयपंथी कैद्यांसाठी स्वतंत्र बराक तयार करा; खुनातील तृथीयपंथी आरोपी उत्तम बाबा सेनापती याची मागणी

Uttam Baba Senapati Latest News: याबाबत गृह सचिवांना ११ ॲाक्टोबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Uttam Baba Senapati
Uttam Baba Senapatiसंजय डाफ

नागपूर: कारागृहात तृतीयपंथीय (Transgender) कैद्यांसाठी स्वतंत्र बराक तयार करा अशी मागणी करणारी एका याचिका सध्या चर्चेत आहे. विशेष म्हणजे ही याचिका खुणातील एका मुख्य आरोपीने केली आहे. उत्तम बाबा सेनापती (Uttam Baba Senapati) या तृथीयपंथी आरोपीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. ही याचिका दाखल झाल्यानंतर उच्च न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस पाठवली आहे. याबाबत गृह सचिवांना ११ ॲाक्टोबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (Nagpur Latest News)

Uttam Baba Senapati
Pankaja Munde : पंकजा मुंडे राष्ट्रवादीत जाणार? अमोल मिटकरी काय म्हणाले, वाचा...

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तमबाबा सेनापती या तृथीयपंथ कैद्याला आपल्याच साथीदाराच्या खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला नागपूर कारागृहात पुरुषांच्या बराकमध्ये ठेवण्यात आले होते. याठिकाणी पुरुषांच्या बराकीत लैंगिक आणि मानसिक छळ होत असल्याचा उत्तमबाबा याने आरोप केला होता. त्यामुळे उत्तमबाबा याने कारागृहात तृतीयपंथीय कैद्यांसाठी स्वतंत्र बराकची मागणी केली आहे. (Chamcham Gajbhiye Murder Case)

कोण आहे उत्तम बाबा सेनापती?

उत्तम बाबा सेनापती (४५, रा. कामननगर, कळमना) हा तृतीयपंथी समाजाचा 'बॉस' आहे. तसेच तृतीयपंथी चमचम गजभिये खुनाचा तो मुख्य आरोपी आहे. तसेच विदर्भ किन्नर समाज या संघटनेचा तो अध्यक्ष आहे. २०१९ मध्ये उत्तमबाबा याने आपल्याच एका तृतीयपंथी सहकाऱ्याची हत्या केली होती. वर्चस्ववादाच्या आणि पैशाच्या वादातून उत्तमबाबा याने धारदार शस्त्राने त्याचा तृथीयपंथ सहकारी चमचम गजभिये याच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. (Latest Marathi News)

किन्नर समाजातील वर्चस्वाच्या वादातून ५ जून २०१९ मध्ये, मंगळवारी दुपारी कळमना हद्दीत ही थरारक घटना घडली होती. या घटनेने किन्नरांसह शहरात खळबळ उडाली होती. या प्रकरणी पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले होते. दरम्यान स्वतंत्र्य बराकीचा निर्णय होईपर्यंत महिला कैद्यांच्या बराकीमध्ये ठेवण्यात यावे अशीही मागणी त्याने केली आहे. या सर्व प्रकरणी अॅड. सोनिया गजभिये यांनी उत्तम बाबा याची बाजू कोर्टात मांडली आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com