पारनेर साखर कारखाना विक्रीच्या चौकशीची 'ईडी'कडे मागणी

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर साखर कारखाना विक्रीच्या चौकशी प्रकरणी कृती समितीच्या वतीने थेट 'ईडी'कडे चौकशीची मागणी करण्यात आलेली आहे.
पारनेर साखर कारखाना विक्रीच्या चौकशीची 'ईडी'कडे मागणी
पारनेर साखर कारखाना विक्रीच्या चौकशीची 'ईडी'कडे मागणीसचिन आगरवाल

अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर साखर कारखाना विक्रीच्या चौकशी प्रकरणी कृती समितीच्या वतीने थेट 'ईडी'कडे चौकशीची मागणी करण्यात आलेली आहे. कारखान्याच्या शेतकरी सभासदांसह इतर प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी माजी खासदार किरीट सोमय्या हे गुरुवारी २३ तारखेला पारनेरमध्ये येणार असल्याची माहिती कृती समितीचे रामदास घावटे व बबनराव कवाद यांनी दिली. (Demand to ED to investigate sale of Parner sugar factory)

हे देखील पहा -

किरीट सोमय्या हे गुरूवारी दुपारी १२: ३० वाजता पारनेरच्या श्री क्रांती शुगर अॅण्ड पॉवर लिमिटेड युनिट भेट देणार आहेत. त्यानंतर ते पारनेर येथील शेतकरी सदस्य, कामगार, ग्रामस्थांशी संवाद साधणार आहेत. दुपारी तीन वाजता पारनेर येथील शासकीय विश्रामगृहात ते पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधणार असल्याचेही रामदास घावटे यांनी सांगितले.

पारनेर साखर कारखाना विक्रीच्या चौकशीची 'ईडी'कडे मागणी
पॅराफीनची दूधात भेसळ करून विक्री

पारनेर कारखाना विकत घेणारी खासगी कंपनी क्रांती शुगर यांच्याकडे कोणतीही मालमत्ता व भांडवल नसताना, सुमारे ३२ कोटी रुपयांना हा कारखाना विकत घेतला होता. राज्य सहकारी बँकेने पारनेर कारखाना विक्रीची बोगस प्रक्रिया राबविली होती. तर, पारनेर विकत घेण्यासाठी वापरलेले २३ कोटी रुपये उद्योजक अतुल चोरडिया व अशोक चोरडिया यांच्याकडून उसणे घेण्यात आल्याचे दाखविण्यात आलेले आहे. तर, उर्वरीत ९ कोटी रुपये अक्षर लॅण्ड डेव्हलपर्स यांच्याकडून घेण्यात आलेले आहेत. आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासातून ही बाब उघड झालेली आहे. असे ही घावटे यांनी सांगितले.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com