खानापूर शहरात डेंग्यूची साथ; रुग्णसंख्या दोनशेपेक्षा जास्त

सध्या खानापूर मध्ये रस्त्याची कामे चालू असल्याने ठीकठिकाणी पाणी साचून राहत आहे.
खानापूर शहरात डेंग्यूची साथ; रुग्णसंख्या दोनशेपेक्षा जास्त
खानापूर शहरात डेंग्यूची साथ; रुग्णसंख्या दोनशेपेक्षा जास्तsaam tv

विजय पाटील

सांगली : सांगली जिल्ह्यातील (Sangli district) खानापूर (Khanapur) शहरात कोरोनावर  डेंग्यूची (Dengue) साथ वरचढ ठरली आहे. एकट्या खानापूर गावात डेंग्यूसदृश ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या दोनशेपेक्षा जात आहेत. तर, कोरोना ऍक्टिव्ह  रुग्ण केवळ 3 आहे. यामुळे खानापुर परिसरात डेंग्यूच्या साथ वाढत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे डोके वर काढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. (Dengue has spread in Khanapur city of Sangli.)

खानापूर शहरात डेंग्यूची साथ; रुग्णसंख्या दोनशेपेक्षा जास्त
अहमदनगरच्या पारनेर तालुक्यात 22 गावांमध्ये कडक लॉकडाउन

खानापुर परिसरात  तीन आठवड्यापासून डेंग्यूच्या साथीने थैमान घातले असून डेंग्यूसदृश रुग्णांची संख्या दोनशेच्या वर गेली आहे. बहुतांश लोक खासगी दवाखान्यांमध्ये उपचार घेत असून शासकीय दवाखान्यांमध्ये उपचार घेणाऱ्यांची संख्या नगण्य आहे. प्रभाग ९ व ११ याठिकाणी  रुग्णांची संख्या जास्त असून या ठिकाणाहून सुरुवात झालेल्या डेंग्यूसदृश या साथीने आता शहरांमध्ये सर्वत्र पाय पसरले आहेत. संथ गतीने रडतखडत चालू असलेल्या रस्त्यांच्या कामामुळे व गटार बांधकामामुळे पाणी साठून राहत आहे. तसेच सध्या खानापूर मध्ये रस्त्याची कामे चालू असल्याने ठीकठिकाणी पाणी साचून राहत आहे. त्याचा व्यवस्थित निचरा होत नसल्याने सध्या डासांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळेच मलेरिया व डेंग्यू सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

रस्त्यालगत असणार्‍या गटारी मधून जवळच असल्याने मटन मार्केटचे पाणी जात आहे. तेच गटार पुढे रस्त्याच्या व गटाराच्या बांधकामांमुळे पाणी साचून राहून रोगराई पसरत आहे. नगरपंचायतकडून दोन-तीन वेळा औषध फवारणी कीटक प्रतिबंधक धूर फवारणी झाली असली तरी सद्यपरिस्थितीत वाढती रुग्ण संख्या पाहता रोजच्या रोज औषध फवारणी करणे गरजेचे आहे. साठलेल्या पाण्याचा निचरा करणे गरजेचे आहे. आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी जनजागृती करणे गरजेचे आहे.  सध्या कोरोनामुळे लोक हैराण झाले असून त्यातच डेंगू सदृश्य रुग्णांची संख्या वाढतच असल्याने लोकांच्या मध्ये भीती निर्माण झाली आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com