Yavatmal Dengue News,
Yavatmal Dengue News, Saam tv

Yavatmal News : सावधान...! यवतमाळला डेंग्यूचा विळखा होतोय घट्ट, रुग्णांना मिळेना बेड

Dengue : रुग्णालयात उपचारासाठी लहान मुलांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे.

- संजय राठाेड

Yavatmal News : यवतमाळ जिल्ह्यात डेंगू, मलेरिया आणि टायफाईड या आजारांनी हाहाकार माजवला आहे. रुग्णांना उपचारासाठी बेड मिळत नसल्याचे चित्र शहरातील विविध रुग्णालयात दिसून येत आहे. (Maharashtra News)

Yavatmal Dengue News,
Swabhimani Shetkari Sanghatana: पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 'स्वाभिमानी' च्या अन्नत्याग आंदोलनाचा दिवस चाैथा... प्रशांत डिक्कर यांची प्रकृती खालवली

यवतमाळ जिल्ह्यामध्ये डेंगू, मलेरिया आणि टायफाईडने सगळीकडे हाहाकार माजवल्याने उपचारासाठी बेड मिळत नसल्याचे चित्र शासकीय रुग्णालयासह खाजगी रुग्णालयांमध्ये दिसून येत आहे. अनेक रुग्णालयात एक बेड दोन रुग्ण अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

Yavatmal Dengue News,
Gokul Dudh Sangh : 'गोकुळ' ला उच्च न्यायालयाचा दणका, आजपासून सभासदांना भेटणार : शाैमिका महाडिक (पाहा व्हिडिओ)

दवाखान्यात रुग्णांच्या लांबच लांब रांगा बघायला मिळत आहेत. लहान मुलांसह मोठ्यांना डेंगू, टायफाईड, मलेरिया या सारखे आजार होत आहेत. रुग्णालयात उपचारासाठी लहान मुलांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे.

डेंग्यूचे 34 रुग्ण

ग्रामीण भागातून सर्वाधिक रूग्ण उपचारासाठी येत असल्याने आरोग्य विभागाने गावगाड्याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहेत. दरम्यान शासकीय रुग्णालयात डेंग्यूचे 34 रुग्ण तर मलेरियाचे 3 रुग्ण असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. याव्यतरिक्त खासगी रुग्णालयांमध्ये देखील रुग्ण असल्याचे बाेलले जात आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com