संत निळोबाराय पालखीचं प्रस्थान पण मुक्काम मंदिरातच!

संत निळोबाराय पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान.
संत निळोबाराय पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान.

अहमदनगर ः आषाढी एकादशीला सर्व वारकऱ्यांची एकच इच्छा असते ती म्हणजे आपल्या लाडक्या विठूरायाच्या दर्शनाची. परंतु कोरोना माहामारीच्या पार्श्वभूमीवर यंदाही अगदी मोजक्या वारकऱ्यांना पंढरपूरला प्रवेश दिला जाणार आहे. अहमदनगरमधील पारनेर तालुक्यातील संत निळोबारायांच्या पालखीला परवानगी देण्यात आली आहे.

या पालखीचं काल पारनेर तालुक्यातील पिंपळनेर येथून पंढरपूरकडे प्रस्थान झालं. या वेळी सर्व वारकऱ्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. झेंडेकरी असतील, विणेकरी असतील इतर वारकरी असतील या सर्वांच्या कोरोना टेस्ट करण्यात आल्या. पिंपळनेर येथील संत निळोबारायांची पालखी निळोबाराय वाड्यापासून मंदिरापर्यंत आणण्यात आली. (Departure of Sant Nilobarai Palkhi ceremony to Pandharpur)

संत निळोबाराय पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान.
हेलिकॉप्टरने वस्तीवर आलं राष्ट्रवादी नेत्याच्या मुलाचं वऱ्हाड

दरवर्षी 64 दिंड्या या दिंडीत सहभागी होत असतात. मात्र, यावर्षी मोजक्याच 40 वारकऱ्यांना घेऊन राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये निळोबारायांची पालखी पंढरपूरला जाणार आहे. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आणि सोशल डिस्टन्सिंग ठेऊन निळोबारायाच्या पालखीचं पूजन करून ज्ञानोबा तुकारामचा जयघोष करीत ठराविक वारकऱ्याच्या उपस्थितीत पालखीचं प्रस्थान झालं. 19 तारखेला पंढरपूरकडे जाणार आहे.

प्रस्थान सोहळ्यास रविवारी पहाटे पाच वाजता सुरुवात झाली. यावेळी निळोबारायांच्या पालखीचे व पादुकांचे पूजन आमदार नीलेश लंके, पोलिस निरीक्षक घनश्याम बळप, निळोबाराय यांचे वंशज गोपाळकाका मकाशीर, देहू संस्थानचे माणिक मोरे, आळंदी संस्थानचे बाळासाहेब अरपळकर आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्याची विधिवत पूजा दिनकर पिंगळे यांनी केली.

यावेळी निळोबाराय देवस्थानचे अध्यक्ष ज्ञानदेव पठारे, कार्याध्यक्ष अशोक सावंत, नायब तहसीलदार अविनाश रणदिवे, डॉ. सुदाम बागल, सरपंच सुभाष गाजरे, राहुल झावरे, सुरेश पठारे, सुभाष पठारे, गणेश हजारे, बाळासाहेब गाडे, संपत वाघुले, उपसरपंच अमोल पोटे, भाऊसाहेब लतांबळे, संपत सावंत, मारुती रासकर, गणपत रासकर आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित असलेल्या जवळपास २०० भाविकांची कोरोना चाचणी करण्यात आली. या सर्वांचा अहवाल हा निगेटिव्ह आल्याने सर्व वारकऱ्यांसह व प्रशासनाने आनंद व्यक्त केला.

निळोबारायांना प्रार्थना

देशावरील व राज्यावरील हे कोरोनाचे संकट लवकर दूर होवो आणि पुढच्या आषाढीला माझ्या सर्व वारकरी बांधवांना पांडुरंगाचे पायी वारीने दर्शन घडू दे, अशी प्रार्थना निळोबारायांना करतो.

- नीलेश लंके, आमदार.

पालखीचा मुक्काम मंदिरातच

पालखीचे प्रस्थान झाले आहे. आता यापुढे दिंडी सोहळ्यात जसे कार्यक्रम असतात, तसे नित्यनेमाने पार पडतील. १८ जुलैपर्यंत पालखीचा मुक्काम निळोबारायांच्या समाधी मंदिरात राहील. त्यानंतर पालखी पंढरपूरकडे एसटी बसने जाईल.

- अशोक सावंत, कार्याध्यक्ष, निळोबाराय देवस्थान. (Departure of Sant Nilobarai Palkhi ceremony to Pandharpur)

Edited By - Ashok Nimbalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com