गेवराईत आगार प्रमुख एसीबीच्या जाळ्यात; 15 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडला

श्रीनिवास वागदरीकर असे लाच घेणाऱ्या आगार प्रमुखाचे नाव
गेवराईत आगार प्रमुख एसीबीच्या जाळ्यात; 15 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडला
गेवराईत आगार प्रमुख एसीबीच्या जाळ्यात; 15 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडलाविनोद जिरे

बीड - गेवराईतमध्ये बस आगार प्रमुखाला, 15 हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सायंकाळच्या दरम्यान शहरातील एका हाँटेलमध्ये केली आहे. श्रीनिवास वागदरीकर असे लाच घेणाऱ्या आगार प्रमुखाचे नाव आहे. गेवराई येथील आगार व्यवस्थापक श्रीनिवास वागदरीकर यांनी आगारातील भांडारपाल यांच्याकडे तुझा स्टोअरचा रिपोर्ट करणार नाही, म्हणून 30 हजार रुपयाची लाच मागीतली होती. 

हे देखील पहा -

यानंतर तडजोडी अंती 15 हजार देण्याचे ठरले. दरम्यान याबाबत तक्रारदार यांनी औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे वागदरीकर यांची तक्रार केली होती. याबाबत लाचलुचपत विभागाकडून पडताळणी केली असता वागदरीकर हे लाच मागत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज सायंकाळच्या दरम्यान शहरातील हाँटेलमध्ये, सापळा रचून वागदरीकर यांना 15 हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com