बाळासाहेबांच्या निधनाने राष्ट्रवादीची मोठी हानी : अजित पवार

बाळासाहेबांच्या निधनाने राष्ट्रवादीची मोठी हानी : अजित पवार
balasaheb bhilare ajit pawar

मुंबई : बाळासाहेब भिलारे यांच्या निधनाने सर्वसामान्य जनतेसाठी काम करणारा सुसंस्कृत नेता हरपला आहे. राजकीय, सामाजिक चळवळीसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली आहे अशी शाेकभावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.

आज (रविवार) राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते प्रल्हाद उर्फ बाळासाहेब भिलारे यांचे हदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच राजकीय क्षेत्रासह नागरिकांना शाेक अनावर झाला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शाेक व्यक्त करताना बाळासाहेब भिलारे यांच्या निधनाने सर्वसामान्य जनतेसाठी काम करणारा सुसंस्कृत नेता हरपला आहे. महाबळेश्वर-पांचगणीच्या विकासासह पर्यटनवाढीसाठी त्यांनी तळमळीने काम केले. त्यांच्या निधनाने सातारा जिल्ह्याने कर्तृत्ववान सुपुत्र गमावला आहे असे म्हटले.

balasaheb bhilare ajit pawar
पर्यटकांनाे! कास पुष्प पठारात गव्यांचा कळप दिसल्यास 'हे' करा

राजकीय, सामाजिक चळवळीसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली आहे. भिलारे कुटुंबियांच्या, नातेवाईकांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी balasaheb bhilare ajit pawar आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान जिल्ह्यातील नेते देखील बाळासाहेब भिलारेंच्या आठवणींनी गहिवरले. समाजकारण आणि राजकारण हे नुसतं नावाला करून उपयोग होत नाही तर ते जगाव लागत, हे दादांनी दाखवून दिले अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com