
Devendra Fadnavis On Uniform Civil Code : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समान नागरी कायद्याबाबत महत्त्वाचं मत मांडल आहे. महाराष्ट्रात समान नागरी कायदा लागू करण्याचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल. देशाच्या राज्यघटनेने ही जबाबदारी राज्यांना दिली असून प्रत्येक राज्याला कधी ना कधी हा निर्णय घ्यावाच लागेल,असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. (Latest Marathi News)
फडणवीसांच्या या विधानामुळे महाराष्ट्रात लवकरच समान नागरी कायद्या लागू होणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी गुजरात दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधत असताना समान नागरी कायदा लागू करण्याबाबत हे विधान केलं आहे. (Maharashtra Politics News)
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
समान नागरी कायद्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, की "देशाच्या राज्यघटनेने राज्यांना समान नागरी कायद्याबाबत जबाबदारी व निर्देश दिले आहेत. पण काही कारणांमुळे देशात तो लागू होऊ शकलेला नाही".
"समान नागरी कायदा गोव्यात अंमलात आला असून उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि गुजरातमध्ये तो अंमलात आणण्यात येणार आहे. प्रत्येक राज्याला याबाबत निर्णय घ्यावा लागणारच आहे. पण मी याची घोषणा करणार नाही, तो अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे", असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
“समान नागरी कायदा गोव्यात आहे, आता उत्तराखंड लागू करत आहे. हिमाचल प्रदेश, गुजरात हे राज्यही समान नागरी कायदा लागू करणार आहेत. हळूहळू सर्व राज्यांमध्ये समान नागरी कायदा लागू करतील. शिवाय त्यांना करावाच लागेल”, फडणवीसांच्या या विधानामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
Edited By - Satish Daud
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.