Maharashtra Deputy Cm History : महाराष्ट्राचे आजवरचे उपमुख्यमंत्री नंतर कधीच मुख्यमंत्री झाले नाही? इतिहास काय सांगतो?

महाराष्ट्राचे आजवरचे उपमुख्यमंत्री नंतर कधीच मुख्यमंत्री झाले नाही? इतिहास काय सांगतो?
Maharashtra Deputy Cm History
Maharashtra Deputy Cm History Saam Tv

>> प्रसाद जगताप

Maharashtra Deputy Cm History : सुधिर मुंनगंटीवारांच्या दाव्यानंतर पहाटेच्या शपथविधीवरून पुन्हा एकदा उलटसुलट चर्चांना उधाण आलंय. पण याच शपथविधीवरून एक इंस्ट्रेस्टींग फॅक्ट समोर आलंय.

आजवर महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या-ज्या लोकांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलीये. त्या लोकांना नंतर मुख्यमंत्रीपद मिळालेलं नाहीये. हा महाराष्ट्रातील आजपर्यतचा इतिहास आहे. याचबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

Maharashtra Deputy Cm History
CBI New Director : भाजपची सत्ता जाताच केंद्राचा मोठा निर्णय, कर्नाटकच्या पोलीस महासंचालकांकडे सोपवली मोठी जबाबदारी

1978 ला महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांसोबतच उपमुख्यमंत्रीही विराजमान

महाराष्ट्रात 1978 पासून आघाड्या-युत्यांचं राजकारण सुरू झालं. या आघाड्या युत्यांच्या राजकारणात उपमुख्यमंत्रीपद हे सोयीचं झालं. 7 मार्च 1978 ला वसंतदादा पाटील यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि तत्कालीन कॉंग्रेसचे नेते नासिकराव तिरपूडे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. महाराष्ट्रात पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांसोबतच उपमुख्यमंत्रीही विराजमान झाला.  (Latest Marathi News)

Maharashtra Deputy Cm History : महाराष्ट्रात आतापर्यत झालेले उपमुख्यमंत्री

1- मार्च 1978 ते जुलै 1978 - नासिकराव तिरपुडे (इंदिरा काँग्रेस)

2- जुलै 1978 ते फेब्रुवारी 1980 - सुंदरराव सोळंके (समाजवादी काँग्रेस)

3- फेब्रुवारी 1983 ते मार्च 1985 - रामराव आदिक (काँग्रेस)

4- मार्च 1995 ते ऑक्टोबर 1999 - गोपीनाथ मुंडे (भाजप)

5- ऑक्टोबर 1999 ते डिसेंबर 2003 - छगन भुजबळ (राष्ट्रवादी)

Maharashtra Deputy Cm History
Who will be Karnataka CM : सिद्धरामय्या की शिवकुमार! विधीमंडळ पक्षाची आज बैठक, कोणाच्या नावावर होणार शिक्कामोर्तब

6- डिसेंबर 2003 ते ऑक्टोबर 2004 - विजयसिंह मोहिते पाटील (राष्ट्रवादी)

7- नोव्हेंबर 2004 ते डिसेंबर 2008 - आर आर पाटील (राष्ट्रवादी)

8- डिसेंबर 2008 ते नोव्हेंबर 2010 - छगन भुजबळ (राष्ट्रवादी)

9- नोव्हेंबर 2010 ते सप्टेंबर 2012 - अजित पवार (राष्ट्रवादी)

10- ऑक्टोबर 2012 ते सप्टेंबर 2014 - अजित पवार (राष्ट्रवादी)

11- पाहटेचा शपथविधी 23 नोव्हेंबर 2019 ते 26 नोव्हेंबर 2019 - अजित पवार (राष्ट्रवादी)

12- मविआ 28 नोव्हेंबर 2019 ते जुन 2022 पुन्हा अजित पवार

13- 30 जुन 2022 रोजी देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली

तिरपुडेंनंतर म्हणजे 1978 पासून ते आजपर्यंत 12 नेत्यांनी उपमुख्यमंत्रापदाची शपथ घेतलीये. ज्यांना नंतर मुख्यमंत्रीपदापर्यंत मजल मारता आली नाही. महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री राहिलेला नेता मुख्यमंत्री बनू शकला नाही, हे वास्तव आहे

आता हा रेकॉर्ड सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस तोडू शकातात का? किंवा ज्यांनी सगळ्यात जास्त उपमुख्यमंत्रीपद मिळवलंय त्या अजित पवारांना इतीहास घडवता येतो? हे नजीकच्या काळात कळू शकेल.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com