
Akola Violence News: अकोला जिल्ह्यातील जुन्या शहरात शनिवारी सायंकाळी दोन गटात तूफान राडा झाला. किरकोळ वादाचं रुपांतर होऊन दोन गटात हिंसक हाणामारी झाली. यावेळी जमावाने काही वाहनांची जाळपोळही केली. अकोल्यातील या हिंसाचाराची गृहमंत्र्यांनी दखल घेतली आहे. अकोल्याच्या घटनेसंदर्भात उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल रात्रीपासून पोलीस महासंचालक तसेच अकोला पोलिसांशी संपर्कात आहेत. सध्या शहरातील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आतापर्यंत या घटनेतील 30 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
अकोल्यात घडलेल्या संपूर्ण घटनेत आठ लोक जखमी झाले असून एकाचा मृत्यू आहे. दोन पोलीस जखमी आहेत. आतापर्यंत 30 जणांना अटक करण्यात आली आहे. आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. रात्रीच्या सुमारास समाजमाध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यानंतर अकोल्यातील जुने शहरात हरिहर पेठ भागात वाद झाला होता. तुफान दगडफेक करण्यात आली. यासह वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ देखील केली होती. दरम्यान आता परिस्थिती नियंत्रणात असून अकोल्यातील काही भागात संचारबंदी लावण्यात आली आहे. कलम 144 लागू करण्यात आली असून सध्या शहरात तणावपूर्ण शांतता आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंसक जमावाने काही वाहनांची तोडफोड केली. या घटनेनंतर जुने शहर पोलीस ठाण्याजवळ मोठा जमाव जमला होता. या हिंसक जमावाने परिसरातील काही वाहनांना लक्ष्य केले. यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करून परिस्थिती नियंत्रणात आणली. (Latest Breaking News)
सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे अकोल्याचे एसपी संदीप घुगे यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अकोला शहरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. रात्री २.३० च्या सुमारास जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनीही घटनेचा आढावा घेत जुने शहर, डाबकी रोड, सिटी कोतवाली व रामदास पेठ या भागात पुढील आदेशापर्यंत संचारबंदी लागू केल्याचे आदेश काढले. (Akola News)
रात्री ११:१५ वाजताच्या सुमारास वाद
सोशल मीडियावरील आक्षेपार्ह मजकुरामुळे संतप्त झालेल्या एका गटाने तोडफोड व दगडफेक सुरू करण्यास सुरुवात केली. यानंतर दोन गटांत तूफान राडा झाला. जुन्या शहरातील हरिहरपेठ परिसरात हे दोन्ही गट शनिवारी रात्री ११:१५ वाजताच्या सुमारास भिडले. त्यानंतर काही लोकांचा जमाव तेथील घरांवर चालून गेला. यावेळी जमावाने मोटारसायकलींचीही मोठ्या प्रमाणात तोडफोड केली, तर एक घरही पेटवून दिले. या घटनेत एक महिला पोलिस कर्मचाऱ्यासह तीन ते चार जण जखमी झाल्याची माहिती आहे. (Latest Marathi News)
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.