ग्रामपंचायतीत अपहार केला, अंगलट आला; फरार उपसरपंचाला बेड्या

ग्रामपंचायतीत अपहार केला, अंगलट आला; फरार उपसरपंचाला बेड्या
क्राईम लोगो

बोटा (अहमदनगर) ः सरपंचपदाच्या कार्यकाळात ग्रामसेवकाच्या मदतीने १६ लाख १३ हजार ७२० रुपयांच्या अपहारप्रकरणी सारोळे पठारचा (ता. संगमनेर) उपसरपंच प्रशांत फटांगरे याला घारगाव पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता, पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दुसरा आरोपी ग्रामसेवक सुनील शेळके पसार आहे.

गावातील एका व्यक्तीने २५ जानेवारी २०२० रोजी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे, ग्रामपंचायतीत शासकीय निधीचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार करून चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार गटविकास अधिकाऱ्यांनी त्रिसदस्यीय समितीची स्थापना करून १० फेब्रुवारी २०२० रोजी चौकशीचे आदेश दिले होते. Deputy Sarpanch of Sarole Pathar arrested by police

क्राईम लोगो
पंकजा मुंडे , विनोद तावडे मोदींच्या भेटीला

समितीने या प्रकरणाचा सखोल तपास करून सन २०१२-१३ ते २०१७-१८ या कालावधीत सरपंचपदावरील फटांगरे व ग्रामसेवक शेळके यांनी संगनमताने आर्थिक गैरव्यवहार व अपहार केल्याचा अहवाल ३१ जुलै २०२० रोजी गटविकास अधिकाऱ्यांना सोपविला होता.

दरम्यान, दोघांना नोटिसा बजावून म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले होते. फटांगरे याने नोटिशीकडे दुर्लक्ष केले. ग्रामसेवक शेळके याने एक ऑक्टोबर रोजी म्हणणे सादर केले. याप्रकरणी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सुनील माळी यांनी फेब्रुवारी २०२१ मध्ये घारगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून विद्यमान उपसरपंच फटांगरे व ग्रामसेवक शेळके या दोघांच्या विरोधात फसवणूक व अपहाराचा गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून हे दोघे पसार होते. पाच महिन्यांनंतर फटांगरे रविवारी रात्री दहा वाजता आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी गावात आला असता पोलिसांनी अटक केली.Deputy Sarpanch of Sarole Pathar arrested by police

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com