बिजोत्पादनातुन शेतकर्‍यांचा विकास- राजेश धूर्वे

मागील वीस वर्षापासून संस्कृती संवर्धन मंडळ लाठ खुर्द गावासाठी काम करत आहे.
राजेश धुर्वे नाबार्ड
राजेश धुर्वे नाबार्ड

नांदेड : मागील वीस वर्षापासून संस्कृती संवर्धन मंडळ लाठ खुर्द गावासाठी काम करत आहे. यामुळे गावातील तरुणांनी बिजोत्पादनात उतरुन विकास साधल्याचे प्रतिपादन नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक राजेश धूर्वे यांनी केले. Development- of- farmers- through- seed- production - Rajesh -Dhurve- nanded- news

कंधार तालुक्यातील लाठ खुर्द येथे संस्कृती संवर्धन मंडळ अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र सगरोळी आणि बळीराजा पाणलोट समिती यांच्या मार्फत नाबार्डच्या ४० व्या वर्धापन दिना निमित्त आयोजित शेतकरी परिसंवादात ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, संस्कृती संवर्धन मंडळाचे समन्वयक रोहित देशमुख, अग्रणी बॅंकेचे जिल्हा व्यवस्थापक गणेश पठारे, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे विभागीय व्यवस्थापक सुहास संगमकर कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. सुरेश कुलकर्णी आदी उपस्थित होते.

हेही वाचा - खानदेशातील १५ हजार शेतकरी झाले वीजबिल थकबाकीमुक्‍त

रविशंकर चलवदे यांनी शासनाच्या विविध योजनाचा लाभ घेऊन शेतकरी उत्पादक कंपन्यांनी व्यवसाय उभा करावा. यासाठी कृषी विभाग तसेच नाबार्ड यांच्या अंतर्गत योजना आणि अनुदानाचा उपयोग करुन विकास साधावा असे सांगितले. पाणलोट विकास कार्यक्रमाचे प्रकल्प समन्वयक गंगाधर कानगुलवार यांनी नाबार्ड अंतर्गत पाणलोट विकास कार्यक्रम तसेच शाश्वत विकास प्रकल्पाबाबत माहिती दिली. याप्रसंगी बळीराजा पाणलोट विकास समिती सदस्य शेतकरी तसेच १३ गावातील शेतकरी उत्पादक कंपन्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक उपस्थित होते.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com