आमचा १ कार्यकर्ता तुमच्यासाठी पुरेसा; फडणवीसांचा मुंडेंना टाेला

अक्कलकोटमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
आमचा १ कार्यकर्ता तुमच्यासाठी पुरेसा; फडणवीसांचा मुंडेंना टाेला
देवेंद्र फडणवीस Saam TV

अक्कलकाेट : अरे वेड्या, भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्राच्या मुंबईतल्या मातीत तयार झालेला पक्ष आहे. दाेन वरुन ३०२ वर गेलेली ही पार्टी आहे. चार सहा खासदार असलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला गाडण्याची भाषा करू नये. भाजपचा एक कार्यकर्ता तुमच्यासाठी पूरेसा आहे, त्यामुळे वल्गना करु नका असा इशारा राज्याचे विराेधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीचे मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव न घेता दिला. devendra fadnavis akkalkot dhananjay munde political news bjp

देवेंद्र फडणवीस
चर्चाच चर्चा उदयनराजे-रामराजेंच्या भेटीची चर्चा

राज्याचे विराेधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आज (साेमवार) सोलापूर दौऱ्यावर आले हाेते. अक्कलकोट येथे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध विकास कामांचा प्रारंभ आणि लोकार्पण करण्यात आले. यावेळी फडणवीस बोलत होते. ते म्हणाले राज्यात शेतकरी आत्महत्या करताहेत, एसटी महामंडळाचे विलीनकरणासाठी कामगारांनी संप पुकारला आहे परंतु दुसरीकडे हे मंत्री नाचगाण्याचे कार्यक्रम करण्याच मग्न आहेत. हे आम्हांला सांगताहेत भारतीय जनता पक्षास मातीत गाडून टाकू या मंत्री धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यावर फडणवीसांनी आपल्या भाषणात समाचार घेतला. ते म्हणाले आमच्या पक्षाचा एक कार्यकर्ता तुमच्यासाठी पुरेसा आहे.

अरे वेड्या, भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्राच्या मुंबईतल्या मातीत तयार झालेला पक्ष आहे. दाेन वरुन ३०२ वर गेलेली ही पार्टी आहे. चार सहा खासदार असलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला गाडण्याची भाषा करू नये. भाजपचा एक कार्यकर्ता तुमच्यासाठी पूरेसा आहे त्यामुळे वल्गना करु नका असा इशारा फडणवीस यांनी दिला.

एककीडे शेतकऱ्यांची वीज ताेडली जात आहे. अहंकारी लोकांना जनता गाडल्याशिवाय राहणार नाही. शिर्डीसारखा विकास अक्कलकोट येथे करू असे फडणवीस यांनी आश्वासन दिले. या कार्यक्रमात अक्कलकोट येथील काँग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेसमधील काही कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

edited by : siddharth latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.