Devendra Fadnavis: त्र्यंबकेश्वरमध्येही अलर्ट! जमावाकडून जबरदस्ती मंदिरात घुसण्याच्या प्रयत्नांनतर गृहमंत्र्यांचे कारवाईचे आदेश

Devendra Fadnavis: त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील या घटनेनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अॅक्शन मोडवर असून त्यांनी पोलीस प्रशासनाला कारवाईचे आदेश दिले आहेत.
Devendra Fadnavis news
Devendra Fadnavis news saam tv

Nashik News: नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात जमावाकडून बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न झाला. या घटनेनंतर पोलीस प्रशासन अलर्ट झालं आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील या घटनेनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस प्रशासनाला कारवाईचे आदेश दिले आहेत. (Latest Marathi News)

त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेशासाठी मुख्य प्रवेशद्वारावर जमाव एकत्र आल्याच्या कथित घटनेसंदर्भात एफआयआर नोंदवून अत्यंत कडक कारवाई करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

फडणवीसांकडून एसआयटी नेमण्याचे आदेश

या घटनेची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्याचे आदेशही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ही एसआयटी केवळ यावर्षीच्या घटनेची चौकशी करणार नाही, तर मागील काळात घडलेल्या अशा प्रकारच्या घटनांचीही चौकशी करेल.

Devendra Fadnavis news
Akola Riots: अकोला, शेवगाव घटनेनंतर CM शिंदे अ‍ॅक्शन मोडवर; पोलीस महासंचालकांना दिले महत्वाचे आदेश

ब्राह्मण महासंघाने दिला होता इशारा

त्र्यंबकेश्वर मंदिरातील प्रकारानंतर जमावावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी मंदिर प्रशासनाने पोलिसांना पत्र लिहिलं होतं. या प्रकारानंतर सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी ब्राम्हण महासंघाकडून करण्यात आली होती.

राज्यातील अनेक भागांत तणावाची परिस्थिती असताना त्र्यंबकेश्वरमध्ये देखील धक्कादायक प्रकार घडला. या घटनेनंतर पोलिस प्रशासनाने कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ब्राह्मण महासंघाने दिला होता.

Devendra Fadnavis news
SHIRDI AIRPORT : साईभक्तांसाठी महत्त्वाची बातमी! शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा महिनाभरातच कोलमडली

नेमकं मंदिर परिसरात काय घडलं?

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात धक्कदायक प्रकार घडला. त्र्यंबकेश्वर मंदिरात जमावाने जबरदस्ती घुसण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी महाराष्ट्र सुरक्षा रक्षकाने जमावाला रोखण्याचा प्रयत्न केला. या प्रकरानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मंदिर प्रशासनाने पोलिसांकडे केली होती.

त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेची गंभीर दखल घेतली. त्यांनी पोलीस प्रशासनाला कारवाईचे आदेश दिले आहेत. देवेंद्र फडणवीसांच्या आदेशानंतर पोलीस प्रशासन काय कारवाई करणार, हे पाहावे लागणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com