चिखलीकरांना देवेंद्र फडणवीसांनी दिले 'हे' आश्वासन

devendra fadnavis
devendra fadnavis

चिखली (काेल्हापूर) : चिखली गावच्या पुर्नवसनाचा प्रश्न प्रलंबित आहे. पुर्नवसित गावांना साेयी सुविधा मिळाव्यात यासाठी सरकारकडे पाठपूरावा केला जाईल. प्राॅपर्टी कार्डचा प्रश्न सुटण्यासाठी महसूल यंत्रणेला जागे करु. प्रसंगी विधानसभेत, विधान परिषदेत आवाज उठविला जाईल. जाे पर्यंत न्याय मिळत नाही ताेपर्यंत संघर्ष सुरु ठेवू असे आश्वासन विराेधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी चिखलीकरांना दिले. दरम्यान सरकारने पूरग्रस्तांना तात्काळ मदत केली पाहिजे त्यासाठी आम्ही पाठपूरावा असेही फडणवीसांनी नमूद केले. (devendra-fadnavis-pravin-darekar-chandrakant-patil-visits-kolhapur-chikhali-sml80)

विराेधी पक्ष नेते फडणवीस devendra fadnavis हे आज (शुक्रवार) काेल्हापूरातील पूरग्रस्त भागाच्या दाै-यावर आहेत. चिखली गावास भेट दिल्यानंतर त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, विधान परिषदेचे विराेधी पक्षनेते प्रवीण दरेकर, सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ उपस्थित हाेते.

फडणवीस म्हणाले भीषण संकटातून चिखलीकरांना जावे लागत आहे. सन २०१९ मध्ये पूर आला. संपुर्ण गाव पाण्याखाली गेले. त्यावेळी आम्ही चंद्रकांतदादांनी मदतीचा तात्काळ निर्णय घेतला. ज्या ज्या ठिकाी नुकासन झाले तेथील ग्रामस्थांना पाच हजार राेखीने, १० हजार खात्यात, छाेट्या दुकानदारांना ५० हजार, जनावारांसाठी ३० हजार रुपये, घराची पडझड झाली त्याकरिता माेठा निधी दिला. शेतक-यांच्या पीक नुकसानीस मदत दिली. शेतक-यांची कर्ज माफ केली. त्यावेळी आम्ही विना विलंब मदत करण्यासाठी प्रयत्न केले आणि ती मदत तात्काळ दिली. रेशनकार्ड नसणा-यांना देखील आम्ही त्या काळात मदत केली.

गेले ३ दिवस आम्ही पश्चिम महाराष्ट्र दाैरा करीत आहे. गत वेळे सारखी मदत व्हावी अशी अपेक्षा पूरग्रस्तांची आहे. अद्याप सरकारकडून काेणतीच मदत जाहीर झालेली नाही. ज्यावेळे पाणी शिरते तेव्हा घरातील सर्व गाेष्टींचे नुकासन हाेते. अगदी मिठाचे देखील नुकसान हाेते. अगदी छाेट्या छाेट्या गाेष्टींना पैसे लागताे. त्यामुळे तात्काळ मदत देणे हे कर्तव्य आहे. अद्याप ते झालेले नाही. त्यामुळे आगामी काळात मदत मिळविण्यासाठी आम्ही सरकारकडे प्रयत्नशिल आहाेत.

खरं म्हणजे अलमट्टी, राधानानगरीच्या विसर्गाची अडचण आलेली नाही. याबराेबरच पाऊस तीनच दिवस पडलेला आहे. या परिस्थिती आपण जलमय हाेत असू तर काेठे तरी अभ्यास करुन यावर उपयायाेजना करण्याचा विचार झाला पाहिजे. सन १९९१, २००५ आणि २०१९ आणि आत्ता २०२१ म्हणजे वर्षाकाठी आपत्ती येत आहे. हे याेग्य नाही. लाेकांचे जीवन बेहाल हाेईल. पूराचे पाणी हे दुष्काळी भागात नेण्याचा आरखाडा आम्ही केला हाेता. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागात हे पाणी नेण्याचा प्रकल्पास वर्ल्ड बॅंकेने त्यास निधी देण्याचे मान्य केले हाेते. परंतु सरकार गेल्यानंतर त्याचा विचार हाेत नाही, हे दुर्देव असल्याची खंत फडणवीस यांनी व्यक्त केली.

devendra fadnavis
Live : मुख्यमंत्री शिराेळला रवाना; पूरग्रस्तांना पॅकेजची आस

पूराच्या पाण्याचा निचरा बाेगद्यांच्या माध्यमातून करीत नाही ताेपर्यंत ते पाणी साठत जाईल आणि आपल्याला अडचणींना सामना करावा लागणार आहे. गावच्या पुर्नवसनाचा प्रश्न प्रलंबित आहे. पुर्नवसित गावांना साेयी सुविधा मिळाव्यात यासाठी सरकारकडे पाठपूरावा केला जाईल. प्राॅपर्टी कार्डचा प्रश्न सुटण्यासाठी महसूल यंत्रणेला जागे करु विधआनसभेत, विधानपरिषदेत आवाज उठविला जाईल. जाे पर्यंत न्याय मिळत नाही ताेपर्यंत संघर्ष सुरु ठेवू असे फडणवीसांनी स्पष्ट केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, विधान परिषदेचे विराेधी पक्षनेते प्रवीण दरेकर, सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ उपस्थित हाेते.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com