Devendra Fadnavis News: मोदी वैश्विक नेते झालेत, त्यामुळे काहींच्या पोटात दुखतंय; फडणवीसांचा निशाणा नेमका कोणावर?

Devendra Fadnavis About Arvind Kejriwal : मोदी वैश्विक नेते झाले, त्यामुळे काहींच्या पोटात दुखत आहे, असा टोला फडणवीसांनी विरोधकांना लगावला आहे.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavissaam tv

Devendra Fadnavis In Solapur: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंह मान यांनी आधी उद्धव ठाकरे आणि आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीबाबत बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. मोदी वैश्विक नेते झाले, त्यामुळे काहींच्या पोटात दुखत आहे, असा टोला फडणवीसांनी विरोधकांना लगावला आहे. ते सोलापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मला अतिशय आनंद होतोय, केजरीवालांनी पवार साहेबांबद्दल असे काही शब्द वापरले होते, जे मी वापरू शकत नाही. उद्धव ठाकरेंबद्दल ते काय बोलले होते आणि उद्धव ठाकरे आणि शिवसेना त्यांच्याबद्दल काय बोलली होती, हे आपण ऐकलं आहे. मोदीविरोधासाठी हे सर्व लोक एकत्र येत आहेत. पण यांनी कितीही विरोध केला तरी जनतेचा मोदीजींवर विश्वास आहे, असेही फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis News: उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीला आलेले वृद्ध सामाजिक कार्यकर्ते भोवळ येऊन जमिनीवर कोसळले

पुढे बोलताना ते म्हणाले की, मोदीजी परदेश दौरा करून परत आलेले आहेत आणि भारताचा मानसन्मान काय आहे हे या परदेश दौऱ्यात दिसून आलं आहे. ज्या पद्धतीने पापोवा न्यू गिनी आणि फिजी देशाने त्यांना सर्वोच्च सन्मान दिला, ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री म्हणतात मोदीजी हे बॉस आहेत आणि अमेरिकेचे राष्ट्रपती म्हणतात आम्हाला त्यांची सही घ्यायची आहे. (Breaking News)

परदेशातील लोकांनी आणि भारतीयांनी मोदींना डोक्यावर घेतलं आहे. ते वैश्विक नेते झाले आहेत. मात्र याचा काही लोकांना आनंद होत नाहीये, त्यांच्या पोटात दुखतंय. त्यांच्या पोटदुःखीचं औषध आमच्याकडे नाहीये, असा टोला फडणवीस यांनी यावेळी विरोधकांना लगावला आहे.

नुकसान भरपाईसाठी 472 कोटी

फडणवीस म्हणाले, शेतकऱ्यांना अवकाळी पावसाच्या नुकसान भरपाईसाठी 472 कोटी रुपयाची मदत दिली आहे. मागच्या दोन महिन्यांची मदत अजून बाकी आहे. ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहचली की नाही याचाही आढावा घेतला जाईल. 198 कोटी मागील अवकाळीचे पोहचलेले आहेत. (Latest Political News)

Devendra Fadnavis
New Parliament Building: नव्या संसद भवनाचा वाद सुप्रीम कोर्टात! राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन व्हावं... जनहित याचिका दाखल

167 गावांमध्ये जलयुक्त शिवार-2

फडणवीस म्हणाले, 167 गावांमध्ये जलयुक्त शिवार-2 ची कामं सुरु होत आहेत. जलयुक्त शिवार-1 मध्ये सोलापूर जिल्हामध्ये 3 लाख 17 हेक्टर हजार संरक्षित जमीन तयार करण्यात आली आहे. जलयुक्त शिवार-2 योजना आम्ही वेगाने पुढे नेत आहोत.

सोलापूरचा विमान सेवेचा प्रश्न आम्ही अंतिम टप्प्यात आणलेला आहे. चिमणीचा प्रश्न ऐरणीवर आहे. मी स्वतः त्याचा पाठपुरवठा करत आहे. नोटीस देखील दिलेली आहे. त्यामुळे सोलापूरकरांच्या मनासारखी कारवाई आपण लवकरच करणार आहोत असे अश्वासन यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. (Latest Marathi News)

Edited By - Chandrakant Jagtap

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com