Devendra Fadnavis News: शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? देवेंद्र फडणवीस यांनी दोन वाक्यात दिलं उत्तर

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर मोठं वक्तव्य केलं आहे.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavissaam tv

Devendra Fadnavis News: शिंदे सरकारला स्थापन करून १ वर्ष होईल. सरकार स्थापन करून १ वर्ष होत आलं तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला नाही. यामुळे अनेक आमदार सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रतीक्षेत आहेत. याचदरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर मोठं वक्तव्य केलं आहे. (Latest Marathi News)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान, फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार, यावर भाष्य केलं. फडणवीस म्हणाले, 'मंत्रिमंडळ विस्तार होणारंच आहे. मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार, याबाबत मुख्यमंत्री शिंदे सांगतील'.

Devendra Fadnavis
Amol Kolhe News : ‘मी पुन्हा येईन सांगायला आता भीती वाटते’, राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीनंतर अमोल कोल्हेंचं वक्तव्य

नाना पटोले यांच्यावर टीका करताना फडणवीस म्हणाले, 'नाना पटोले ज्या पक्षात आहेत, त्यांच्यात तर प्रातविधीलाही जाण्यासाठी दिल्लीवरुन हायकमांडची परवानगी घ्याली लागते. आमचा तर राष्ट्रीय पक्ष आहे. आम्ही दिल्लीला गेलो तर काय झालं'.

संजय राऊतांच्या थुंकण्यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली. 'संजय राऊत यांच्यावर प्रतिक्रिया देणार नाही, असे फडणवीस म्हणाले. आगामी निवडणुकीवर भाष्य करताना फडणवीस म्हणाले, 'शिवसेना आणि भाजप सर्व निवडणुका एकत्र लढवण्यावर चर्चा झाली आहे. तालुका-जिल्हा स्तरावर दोन्ही पक्षात समन्वय ठेवण्याचा निर्णय झाला आहे. एकत्र निवडणूक लढण्यासाठी रणनीती आखायची आहे'.

Devendra Fadnavis
Ajit Pawar News: "…नाहीतर कानाखालीच आवाज काढीन", भर बैठकीत अजित पवारांनी कार्यकर्त्यांना झापलं, पाहा VIDEO

नगरच्या एका कार्यक्रमात औरंगजेबाचे फोटो झळकवण्यावरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे. 'औरंगजेबाजे फोटो कुणी झळकवत असेल तर मान्य केलं जाणार नाही. आमचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज आहे. कुणी औरंग्याचं नाव घेत असेल तर माफी नाही, अशा कडक शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी कारवाईचा इशारा दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com