Kolhapur Bandh Update : काेल्हापूरात तणाव, गृहमंत्र्यांची विराेधी पक्षावर संशयाची सूई (पाहा व्हिडिओ)

सरकार कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे काम करत आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.
Devendra Fadnavis, kolhapur bandh update, cm eknath shinde, aurangzeb
Devendra Fadnavis, kolhapur bandh update, cm eknath shinde, aurangzebsaam tv

Kolhapur Bandh Update : काेल्हापूरातील विराेधी पक्षाचे नेते म्हणतात मला माहित आहे दंगल घडविण्यात येणार आहे. त्यानंतर काही युवक औरंगजेब, टिप सुलतान (tipu sultan) यांचे उदात्तीकरण करतात आणि त्यानंतर प्रतिक्रिया उमटतात. या विधानांचा आणि घटनांचा काही संबंध आहे का ? अचानक महाराष्ट्रात औरंगाजेब (aurangzeb) याचे उदात्तीकरण करणारे कसे आले. काेणा यांना फूस लावत आहे याची चाैकशी सुरु असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले. (Maharashtra News)

Devendra Fadnavis, kolhapur bandh update, cm eknath shinde, aurangzeb
Shivrajyabhishek Din : ठरवलं तर रायगड किल्ला ताब्यात घेऊ; लाखाे शिवप्रेमींच्या साक्षीने संभाजीराजे गरजले (पाहा व्हिडिओ)

कोल्हापुरात (Kolhapur) काही युवकांनी वादग्रस्त स्टेटस ठेवले. त्यामुळे तणाव निर्णाण झाला त्यातून दोन गट आमने-सामने आले. शहरातील दसरा चौक टाऊन हॉल आणि लक्ष्मीपुरी परिसरात दगडफेक झाल्याच्या घटना देखील घडल्या. परिणामी कायदा व सुरक्षा अबाधित राहावी यासाठी पाेलिसांची माेठा कुमक घटनास्थळी दाखल झाली. परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांनी काही जणांना तंबी दिली. दरम्यान आज (बुधवार) हिंदुत्ववादी संघटनांनी काेल्हापूर बंदची हाक दिली आहे.

Devendra Fadnavis, kolhapur bandh update, cm eknath shinde, aurangzeb
Mission Admission : अकरावी प्रवेशासाठी आठ जूनपासून भरावे लागणार पसंतीक्रम; जाणून घ्या वेळापत्रक

आज नवी मुंबईत येथे माध्यमांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (dcm devendra fadnavis) यांना काेल्हापूरच्या घटनेचविषयी छेडले असता फडणवीस म्हणाले काही गोष्टी आम्हांला समाजताहेत. जे चुकीचे आहे ते खपवून घेतले जाणार नाही.

अचानकपणे औरंगजेब, टिपू सुलतान यांचे राज्यातील विविध जिल्ह्यात उदात्तीकरण होणे हा काही याेगा याेग नाही हे आम्हांला स्पष्ट दिसत आहे. विराेधी पक्षाचे वारंवार दंगली घडविण्याचा प्रयत्न असे म्हणणे आणि औरंगजेबचे उदात्तीकरण हाेणे याचा तपास सुरु आहे असेही फडणवीस यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com