Congress Banner: देवेंद्र फडणवीस साहेब आपले ऐतिहासिक कल्याण नगरीत स्वागत...पण पालकमंत्र्यांना सोबत घेवून या...काँग्रेसची बॅनरबाजी

Political News: सध्या राज्यात बॅनरबाजीच्या माध्यमातून जोरदार राजकारण सुरू झाल्याचे पाहायला मिळतं आहे.
Congress Banner
Congress BannerSaam Tv

अभिजीत देशमुख

Devendra Fadnavis News: देवेंद्र फडणवीस साहेब आपले ऐतिहासिक कल्याण नगरीत स्वागत..पण येताना पालकमंत्री शंभूराज देसाई यांना आपल्या सोबत घेवून या... जेणेकरून भाजप पदाधिकाऱ्यांसोबत कल्याण डोंबिवलीतील नागरिकांना देखील पालकमंत्री बघायला मिळेल असे उपहासात्मक बॅनर कल्याण येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेसच्या वतीने लावण्यात आले आहेत. (Latest Marathi News)

Congress Banner
Kolhapur News : प्राध्यापिकेकडून औरंगजेबाचं उदात्तीकरण ‌करणारं वक्तव्य; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

या बॅनरवर पालकमंत्री शंभूराजे देसाई (Shambhuraj Desai) यांच्या फोटोवर मिसिंग असे देखील लीहण्यात आले आहेत. १९ तारखेला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या जाहीर सभेच्या पार्श्वभूमीवर एकंदरीतच हा बॅनर शहरात चर्चेचा विषय ठरत आहे.

सध्या राज्यात बॅनरबाजीच्या माध्यमातून जोरदार राजकारण सुरू झाल्याचे पाहायला मिळतं आहे. कधी भावी मुख्यमंत्र्यांचा बॅनर, कधी भाजपचा (BJP) कधी शिवसेनेकडून एकमेकांना डिवचण्यासाठी लावण्यात आलेले बॅनर यामुळे राज्यातील राजकारण तापलं आहे.

येत्या 19 जून रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे कल्याणमध्ये (Kalyan) येणार आहेत. भाजपच्या मोदी@9 महा जनसंपर्क अभियान अंतर्गत कल्याण फडके मैदानावर जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात बॅनर लावण्यात आला आहे. कल्याण मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या 19 तारखेची सभा व आज होणाऱ्या शिवसेनेच्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेला बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

Congress Banner
Electricity for Farmers: शेतकऱ्यांना दिवसाही मिळणार वीज, सरकार लवकरच राबवणार 'ही' योजना

काय लिहलंय बॅनरवर

देवेंद्र फडणवीस साहेब आपले ऐतिहासिक कल्याण नगरीत स्वागत आहे.आपल्या सरकार मध्ये सहभागी असलेले पालकमंत्री माननीय शंभूराजे देसाई यांना आपल्या सोबत घेऊन या जेणेकरून भाजप पदाधिकाऱ्यांसोबत कल्याण डोंबिवलीतील नागरिकांना देखील पालकमंत्री बघायला मिळेल

Missing

माननीय श्री शंभूराज देसाई पालकमंत्री ठाणे जिल्हा

यांना आपण पाहिलं का?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com