Nashik News : ब्रह्मगिरी पर्वतावर पुन्हा दरड कोसळली; बीडच्या भाविकाचा मृत्यू

Nashik Bramhagiri Fort News: त्र्यंबक पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Breaking News, Nashik, bramhagiri fort
Breaking News, Nashik, bramhagiri fortsaam tv

Bramhagiri Fort News : नाशिक जिल्ह्यातील ब्रम्हगिरी पर्वतावर दगड कोसळून एका भाविकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. भानुदास आरडे असं मृत भाविकाचं नाव असून ते बीडचे रहिवाशी असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. दरम्यान यापूर्वीही ब्रम्हगिरी पर्वतावर दरड कोसळून ४ भाविकांचा मृत्यू झाला होता. (Maharashtra News)

Breaking News, Nashik, bramhagiri fort
Sangamner Market Committee Election Results : हाेमपीचवर बाळासाहेब थाेरात चॅम्पियन, महसूलमंत्र्यांच्या हाती भाेपळा; संगमनेरात जल्लाेष सुरु

पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. आरडे यांच्या अंगावर तीन ते चार दगड पडले होते. तसेच हात, पाय आणि डोक्याला जबर मार लागल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Breaking News, Nashik, bramhagiri fort
Prithviraj Chavan On Sharad Pawar Decision To Step Down As NCP President : मानाचं स्थान राहील ! शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेवर काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले...

या घटनेची माहिती समजताच त्र्यंबक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ब्रह्मगिरीवरुन डोलीवाल्यांच्या सहकार्याने आरडे यांचा मृतदेह गंगाद्वार लगत आणले. त्यानंतर गंगाद्वारवरुन त्र्यंबकराजा मित्र मंडळाच्या रुग्णवाहिकेतुन मृतदेह शहरातील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला..

त्र्यंबक पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबतचा अधिक तपास वरीष्ठ पोलीस निरीक्षक बिपीन शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार गंगावणे करत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com