शिंगणापुरात शनिअमावस्या असूनही शुकशुकाट

शिंगणापुरात शनिअमावस्या असूनही शुकशुकाट
शनि शिंगणापुरात स्क्रिनवरून दर्शन

विनायक दरंदले, सोनई

शनैश्वर देवस्थान ट्रस्टने कोरोना स्थिती लक्षात घेवून आजची शनिअमावस्या यात्रा रद्द केली. मंदिर बंद असतानाही दिवसभरात दहा ते पंधरा हजार भाविकांनी दर्शन घेतले. महाद्वारसमोरील स्क्रीनवर शनिदर्शन घेवून भाविकांनी समाधान मानले. अठ्ठावीस वर्षांत प्रथमच यात्रा सोहळा सुनासुना पाहण्यास मिळाला.

शुक्रवारी सायंकाळपासून मुख्य रस्त्यावर पोलिस यंत्रणा व देवस्थान सुरक्षा विभागाने बंदोबस्त लावला होता. महाद्वार परीसरात अधिक गर्दी होणार नाही. याकरीता विशेष नियोजन करण्यात आले होते. पहाटे साडेचार वाजता महंत त्रिंबक महाराज यांच्या हस्ते आरती सोहळा झाला. यावेळी मुख्य पुरोहित अशोक कुलकर्णी व अन्य तीन कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमास शासन नियमांचे पालन करीत कोणासही मंदिरात प्रवेश दिला नव्हता. (Devotees did not come to Shinganapur due to lockdown)

शनि शिंगणापुरात स्क्रिनवरून दर्शन
कोरोनाच्या दोन्ही लाटेत नगरमधील तेरा गावे होती निर्धास्त

आज शनिशिंगणापुरला भेट दिली असता वाहनतळ, दर्शनपथ व मंदिर परिसरात शुकशुकाट पाहण्यास मिळाला. यापूर्वी शनिअमावस्या यात्रेस दहा ते पंधरा लाख भाविकांची गर्दी पाहण्यास मिळत होती. आज मात्र अवघे दहा ते बारा हजार भाविकांनी दिवसभरात स्क्रीन व कळसाचे दर्शन घेतले. मुख्य रस्त्यावर पूजासाहित्याचे काही दुकाने थाटण्यात आली होती. भाविकांनी संरक्षण कठड्यावर पूजासाहित्य अर्पण करून दर्शन घेतले.

कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात घेवून देवस्थान ट्रस्टच्या वतीने आवश्यक काळजी घेण्यात आली. रस्त्यावर विशेष बंदोबस्त ठेवून आलेले भाविक लवकर निघून जाण्यासाठी नियोजन करण्यात आले होते. मंदिरात कोणासही प्रवेश दिला नाही.

- भागवत बानकर, अध्यक्ष,शनैश्वर देवस्थान ट्रस्ट.

लटकूंवर कारवाई नाही

अतिशय कमी गर्दी असतानाही रस्त्यावर दहा ते पंधरा लटकू वाहने अडवून पुजासाहित्याची सक्ती करताना दिसले. ग्रामपंचायतीच्या बंद असलेल्या प्रवासी करनाक्यावर अडवणूक करण्यात येत असताना पोलिसांनी दिवसभरात एकही कारवाई केली नाही हे विशेष.

(Devotees did not come to Shinganapur due to lockdown)

Edited By - Ashok Nimbalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com