पंकजाताई माझी औकात काढताना 2019 चा पराभव विसरलात का? धनंजय मुंडेंचा घणाघात (Video)

चार विभागाच्या मंत्री असताना परळीच्या जनतेने तुमची औकात दाखवून दिली विसरू नका.
पंकजाताई माझी औकात काढताना 2019 चा पराभव विसरलात का? धनंजय मुंडेंचा घणाघात (Video)
पंकजाताई माझी औकात काढताना 2019 चा पराभव विसरलात का? धनंजय मुंडेंचा घणाघात (Video)Saam Tv

बीड - तुम्ही 32 नंबरच्या खात्याचे मंत्री म्हणत, पंकजा मुंडेनी केलेली टीका धनंजय मुंडेंच्या चांगलीच जिव्हारी लागल्यानं, धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेचा चांगलाच खरपूस समाचार घेतला आहे. केज नगरपंचायतच्या प्रचार सभेत धनंजय मुंडे यांनी तुफान फटकेबाजी करत पंकजा मुंडेना प्रतिउत्तर दिलं आहे. बीडमध्ये मुंडे बहिण भावात आरोप प्रत्यारोपाच्या फैरीवरून चांगलीच जुंपली आहे. नगरपंचायतच्या निवडणूक आखाड्यात पंकजा आणि धनंजय यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून यातच प्रचाराच्या अंतिम टप्प्यात जुगलबंदी सुरू झाली.

वडवणी नगरपंचायतच्या जाहीर सभेत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर सडकून टीका केली होती. निवडणुकीच्या तोंडावर 100 कोटीची घोषणा करतात, दोन वर्ष काय टाळ कुटत होते का? असा सवाल करत उपरोधिक टोला लगावला होता.

यावर धनंजय मुंडे भडकले आणि पंकजा मुंडेंना जशास तसे प्रतिउत्तर दिले आहे. भाजपचे कमळ बिडातून गायब झालं. केज नगरपंचायतमध्ये साधा एकही उमेदवार भाजपला मिळत नाही. एवढी वाईट वेळ भाजपवर आली आहे. साधा एक उमेदवार उभा करता आला नाही तुम्हाला अन तुम्ही माझी औकात काढता. ताई औकात काढताना दोन वर्षा पूर्वीचा निकाल तर लक्षात ठेवा. तुम्ही माझ्या वर टीका करा. कारण तुम्ही माझ्या ताई आहेत. यापूर्वी देखील 10 वेळा मी कधी तुम्ही टीका केली असेल. पण आज तुम्ही सामाजिक न्याय आणि विशेष विभागाची औकात काढली. ताई आज सामाजिक न्याय विभागाची औकात काढून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला आहे. अस देखील धनंजय मुंडे म्हणाले.

पंकजाताई माझी औकात काढताना 2019 चा पराभव विसरलात का? धनंजय मुंडेंचा घणाघात (Video)
Nanded: बोगस डॉक्टरचा तरुणीवर बलात्कार; डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल

पुढे ते म्हणले की, 2019 ला निवडणूक लढवत होता त्या वेळी महिला बालकल्याण, जलसंधारण ,ग्रामविकास या खात्याचे नंबर मला माहित नाहीत. मात्र हे सगळं असताना परळीच्या जनतेने तुम्हाला औकात दाखवून दिली, हे विसरलात का? बीड जिल्ह्यात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यापुढं संकटं असताना ताई आपण कुठे होतात? बीड जिल्ह्यात अतिवृष्टीचे 502 कोटी अनुदान मिळवून दिले. शेतकऱ्यांच्या खात्यावर पैशे जमा झाले 25% अग्रीम विमा दिला ही आमची औकात सामाजिक न्याय विभागाला कमी समजू नका. राज्यातील 35% लोकांच्या संपर्कात आहे.या विभागात काय नाही, विधवा परित्यक्ता, किन्नर, अंध अपंग, दलित वंचित आहेत. याच विभागात किती जणांचा अपमान केला. 32 व्या नंबर चे खाते 1 नंबरला नेऊ शकतो, हा विश्वास पवार साहेबांना आहे. त्यामुळं त्यांनी हे खात मला दिल.

तुमच्याकडे टॉप फाईव्ह मधील ग्रामविकास, महिला बालकल्याण, जलसंधारण, अशी महत्वाची खाते घेऊन निवडणुकीत हारालात.म्हणून "किसीं की हैसीयत और औकात पे मत जाना".पाच वर्षात तुम्ही मंत्री असताना आमदार,खासदार, राज्यात केंद्रात सत्ता होती, तरी देखील केज मध्ये मूलभूत सुविधा नाहीत. शेवटी "मै मेरी औकात बताके रहूगा.अस म्हणत धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंना इशारारूपी आव्हान दिले.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com