कोण किती जातीयवादी, एकदा समोरा-समोर बसू; धनंजय मुंडेंचे राज ठाकरेंना आव्हान

राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेतील भाषणांवरून, धनंजय मुंडेंनी राज ठाकरे यांना खुले आव्हान दिले आहे.
Dhananjay Munde | Raj Thackeray
Dhananjay Munde | Raj ThackeraySaam TV

बीड: राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेतील भाषणांवरून, धनंजय मुंडेंनी राज ठाकरे यांना खुले आव्हान दिले आहे. ते म्हणाले, की भोंग्यापेक्षा बेरोजगारांचा प्रश्न महत्वाचा आहे. भोंगे लावने अन काढण्याने आजच्या तरुणांना भाकर मिळणार आहे का? दोन जातीत तेढ निर्माण करण्याचे काम मनसे करीत आहे. भोंग्याच्या प्रश्नांने महाराष्ट्र आणखीन प्रगत होणार असेल तर त्यांची भूमिका योग्य आहे असे समजू. पुरोगामी महाराष्ट्रात जे घडलं नाही ते घडवायचा प्रयत्न सुरू आहे. पवार साहेबांनी कधीच जातपात मानली नाही. कोण किती जातीवादी आहेत, एकदा महाराष्ट्राच्या जनतेला कळू द्या. एकदा समोरासमोर बसू. असं म्हणत धनंजय मुंडेंनी (Dhananjay Munde) राज ठाकरेंना (Raj Thackeray) आव्हान दिलं आहे. ते बीडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

Dhananjay Munde | Raj Thackeray
'आता बोला', संजय राऊतांनी दिले शिवसैनिकांनी बाबरी पाडल्याचे पुरावे

दरम्यान राज ठाकरेंनी काल झालेल्या भाषणात शरद पवारांवरती टीका केली. 'शरद पवार म्हणाले मी दोन समाजात दुही माजवतोय हे महाराष्ट्रासाठी योग्य नव्हे'. मात्र, पवारसाहेब आपण जाती जातींमध्ये भेद निर्माण करतायत ना त्याने दुही माजतेय. प्रतेक व्यक्ती जातीतून बघायची, पुस्तक वाचचाना सुद्धा लेखक कोणत्या जातीचा आहे हे बघायचं. तसंच मी बोलल्यापासूनच ते राष्ट्रवादींच्या सभांमधून शिवाजी महाराजांचं नावं घ्यायला सुरुवात झाली. आता काय तर व्हिडीओ काढतायत गीत रामायण ऐकतायत आणि शेजारी शिवाजी महाराजांच पुस्तक ठेवलं आहे. त्या दिवशी मी म्हंटल शरद पवार नास्तिक आहेत ते झोंबल.

मला माहिती होतं ते बोललो लगेच देवाचे फोटो काढले. पण आपल्या कन्या लोकसभेत बोलल्या आहे की माझे वडील नास्तिक आहेत. आता यापेक्षा जास्त काय पुरावा देऊ मी' असंही राज ठाकरे कालच्या सभेत म्हणाले होते. त्याला आता राष्ट्रवादीचे नेते तथा मंत्री धनंजय मुंडे यांनी उत्तर दिले आहे आणि समोरा-समोर चर्चेला बसण्याचे आव्हान दिले आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com