जल आक्रोश मोर्चा नव्हे, हा तर भाजप नेत्यांच्या आतला आक्रोश : धनंजय मुंडे

औरंगाबाद येथे काढलेल्या जल आक्रोश मोर्चावर राष्ट्रवादीचे नेते मंत्री धनंजय मुंडे यांनी सडकून टीका केली आहे
Dhananjay Munde
Dhananjay Munde Saam Tv

बीड : भाजपने औरंगाबादमध्ये पाणीप्रश्नावरून जल आक्रोश मोर्चा काढला. या मोर्चाचं नेतृत्व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं. औरंगाबादमधील देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) चांगलेच आक्रमक झाले आहेत.औरंगाबादकरांचा पाणीप्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत माघार घेणार नसल्याचं फडणवीसांनी यावेळी सांगितले. औरंगाद येथे झालेल्या भाषणात फडणवीस यांनी शिवसेना आणि सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडलं. दरम्यान, औरंगाबाद येथे काढलेल्या जल आक्रोश मोर्चावर राष्ट्रवादीचे नेते, मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde ) यांनी सडकून टीका केली आहे. ( Dhananjay Munde Criticized devendra fadnavis over jal akrosh morcha )

हे देखील पाहा -

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा आज बीडच्या अंबाजोगाईमध्ये कार्यक्रम होता. बीडच्या अंबाजोगाई येथील आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. त्यावेळी फडणवीसांवर टीका करताना म्हणाले, 'पावसाळ्याच्या तोंडावर जल आक्रोश मोर्चा नाही, तर भाजप नेत्यांच्या आतला आक्रोश बाहेर आला आहे, असं म्हणत मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांना खोचक टोला लगावला आहे. यावेळी मुंडे यांनी राज्याने केलेल्या पेट्रोल-डिझेलच्या दर कपातीवरून देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलं आहे. 'अगोदर इंधन दरवाढीची सेंचुरी करायची, नंतर कमी केली म्हणून दाखवायचं. सगळ्यात मोठी फसवणूक तर केंद्र सरकारने देशाच्या सामान्य जनतेची केली आहे, अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं आहे.

Dhananjay Munde
'नाना पटोले यांना ठाकरे सरकारमध्ये कोणीच गंभीरपणे घेत नाही ?'; भाजप खासदाराची टीका

औरंगाबादेत देवेंद्र फडणवीसांची शिवसेनेवर टीका

औरंगाबादेतील जल आक्रोश मोर्चाच्या भाषणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. औरंगाबादच्या भाषणात फडणवीस म्हणाले, 'औरंगाबादच्या इतिहासातला हा अभूतपूर्व मोर्चा आहे. २०१३ मध्ये मोर्चा काढला, त्यावेळी सत्ता परिवर्तन अटळ असल्याचं सांगितलं होतं, त्यावेळी सत्ता परिवर्तन झालं. शिवसेनेच्या सत्तेत भ्रष्टाचारी यंत्रणा झाली आहे. आम्ही संघर्ष छेडला आहे. हा संघर्ष जो पर्यंत पाणी मिळत नाही तो पर्यंत असणार आहे', अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

Edited By - Vishal Gangurde

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com