''मी आतापर्यंत कधीच राजकारण केले नाही ! केले ते फक्त समाजकारण''

दरम्यान वाढदिवसाचं औचित्य साधत घेतलेल्या कार्यक्रमातून, धनंजय मुंडे यांनी यापुढे मनातून राजकारण करणार असल्याचं भूमिका घेतलीय.
''मी आतापर्यंत कधीच राजकारण केले नाही ! केले ते फक्त समाजकारण''
धनंजय मुंडेविनोद जिरे

बीड: मी कधी मनातून राजकारण केल नाही, केलं ते फक्त समाजकारण. मात्र आत्ता मी आज सर्वांसमोर सांगतो, की मी आजपासून मनातून राजकारण करणार. ज्यांना ज्यांना वाटतं आता परळीकडं लक्ष दिलं पाहिजे, त्यांनी अगोदर लक्षात घ्यावं, की मी अगोदरच इथं लक्ष दिलंय. असं म्हणत राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी, पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचं नाव न घेता निशाणा साधला. ते परळी येथे वाढदिवसाचे औचित्य साधत, घेतलेल्या कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.

धनंजय मुंडे
''मैत्रीला धोका देवून शिवसेनेने सत्तेसाठी शेण खाल्ले''

ते पुढे बोलतांना म्हणले की, लोक जेव्हा मला शिव्या देत होते, त्या काळात मला शरद पवार (Sharad Pawar) साहेबांनी विरोधीपक्ष नेता हे पद दिले. हे उपकार मी कधीच विसरू शकत नाही. मी पाहिलेले स्वप्न म्हणजे सिरसाळा येथे सुरू होणारी, एमआयडीसी आहे.आणि या ठिकाणी मी देशातील हवे तेवढे उद्योग येणाऱ्या काळात आणणार आहे. मी मरेल पण तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. हे वचन मी आज माझ्या जन्मदिनी आपल्याला देतो. असा विश्वासही या प्रसंगी धनंजय मुंडे यांनी परळीकरांना दिला.

दरम्यान वाढदिवसाचं औचित्य साधत घेतलेल्या कार्यक्रमातून, धनंजय मुंडे यांनी यापुढे मनातून राजकारण करणार असल्याचं भूमिका घेतलीय. यामुळं मुंडे भगीणींच्यासाठी झालेल्या राजीनामासत्रा नंतर धनंजय मुंडेंकडून ही भूमिका घेण्यात आल्यानं. राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा, नगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर चांगलीच चर्चा रंगू लागलीय...

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com