धनंजय मुंडे यांचे Facebook अकाउंट हॅक!

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे फेसबुक खाते हॅक झाले असून तशी माहिती खुद्द मुंडे यांनी दिली आहे.
धनंजय मुंडे यांचे Facebook अकाउंट हॅक!
धनंजय मुंडे साम टीव्ही

मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay munde) यांचे फेसबुक खाते (facebook account hacked) हॅक झाले असून तशी माहिती खुद्द मुंडे यांनी दिली आहे. याबाबत फेसबुकला देखील कळवण्यात आले आहे. तसेच सायबर सेलकडे (cyber cell) तक्रार देखील करण्यात आल्याची माहिती मुंडे यांनी दिली आहे.

हे देखील पहा :

धनंजय मुंडेंचे ट्विट...

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपले फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याची माहिती दिली आहे. मी धनंजय मुंडे या अधिकृत अकाऊंटवरुन अॅडमीन आणि मॉडेरेटर म्हणून कुठलिही अॅक्टिव्हिटी करु शकत नाही. त्यामुळे फेसबुकने लक्ष देऊन लवकरात लवकर मला माझे अॅडमीनचे अधिकार देत पेज सुरु करावे, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी फेसबुककडे केलीय. तसंच याबाबत महाराष्ट्र सायबर सेलकडे आपण रितसर तक्रार दाखल केल्याची माहितीही मुंडे यांच्याकडून देण्यात आली आहे.

धनंजय मुंडे
प्रणयक्रीडा करणाऱ्या सापांना पकडणं जीवावर बेतलं; सर्पदंशाने तरूणाचा मृत्यू!

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com