धारुरच्या भाजप नगराध्यक्षां विरोधात तक्रार दाखल; अश्लिल चाळे केल्याचा आरोप

या गुन्ह्या विरोधात आज असोसिएशनच्या सर्व डॉक्टरांनी आपले हॉस्पिटल बंद ठेवले
धारुरच्या भाजप नगराध्यक्षां विरोधात तक्रार दाखल; अश्लिल चाळे केल्याचा आरोप
धारुरच्या भाजप नगराध्यक्षां विरोधात तक्रार दाखल; अश्लिल चाळे केल्याचा आरोपविनोद जिरे

बीड- धारूर Dharur शहराचे भाजपचे BJP नगराध्यक्ष, डॉ. स्वरूपसिंह हजारी यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने, राजकीय व आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. गर्भवती महिलेची सोनोग्राफी Sonography करायची, असं कारण सांगून सोनोग्राफी सेंटरमध्ये अश्लील चाळे करत जातीवाचक बोलून विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यातील डॉक्टर हा स्त्रीरोग तज्ज्ञ असून धारूर नगर पालिकेचा विद्यमान नगराध्यक्ष आहे.

हे देखील पहा -

तर या विरोधात डॉक्टर आणि व्यापारी असोसिएशन कडून हा गुन्हा खोटा असल्याचे सांगत तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी केली आहे. या गुन्ह्या विरोधात आज असोसिएशनच्या सर्व डॉक्टरांनी आपले हॉस्पिटल बंद ठेवले असून व्यापारी असोसिएशन कडून देखील बाजारपेठ कडकडीत बंद ठेऊन गुन्हा तात्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे. यामुळे बीड जिल्ह्यात राजकीय वर्तुळासह वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

धारुरच्या भाजप नगराध्यक्षां विरोधात तक्रार दाखल; अश्लिल चाळे केल्याचा आरोप
मेळघाटात रस्त्यावर उतरले बहुरूपी देव

डॉ. स्वरूपसिंह हजारी असे आरोप झालेल्या नगराध्यक्षाचे नाव आहे. ते धारूर नगर पालिकेत विद्यमान नगराध्यक्ष पदावर आहे. तसेच स्त्रीरोगतज्ज्ञ असून ते धारूरमध्येच खाजगी दवाखाना चालवतात. काल दुपारी १९ वर्षाची गर्भवती तपासणीसाठी आली होती.तिला सोनोग्राफी करायची असे कारण सांगून, सोनोग्राफी सेंटर मधेच अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. तसेच जातीवाचक बोलल्याचा देखील आरोप करण्यात आला आहे. हा प्रकार नातेवाईकांना सांगून गर्भवती थेट धारूर ठाण्यात पोहचली. तक्रार दिल्यानंतर डॉ. हजारी विरोधात विनयभंग व अट्रोसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com