महाविकास आघाडीचे नेते प्रसिद्धीसाठी करतात काम : माजी ऊर्जामंत्री बावनकुळे
Chandrashekhar bawankule

महाविकास आघाडीचे नेते प्रसिद्धीसाठी करतात काम : माजी ऊर्जामंत्री बावनकुळे

राज्य सरकारने ओबीसी आरक्षण घालवले असून राज्यात भाजपचे सरकार असताना काँग्रेसच्या नेत्यांनी कोर्टात जाऊन त्यावर आक्षेप घेतल्याचा गंबीर आरोप देखील त्यांनी केला आहे.

धुळे : राज्य सरकारमधील महाविकास आघाडीचे नेते संजय राऊत व नाना पटोले हे प्रसिद्धीसाठी काम करतात. तसेच जनतेच्या प्रश्नांविषयी सरकारला काहीच देणे घेणे नसल्याचा आरोप माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेतून केला. (dhule-bjp-mla-chandrashekhar-bavankule-tour-dhule-press-conferance-and-target-maha-vikas-aaghadi)

Chandrashekhar bawankule
हातावरची मेहंदीही पुसली नाही; लग्‍नाच्‍या दहाव्‍याच दिवशी नवविवाहितेची आत्‍महत्‍या

युवा मोर्च्याच्या युवा वॉरियर्स, हेल्थ वॉरियर्स मोर्चा अभियानाच्या निमित्ताने बावनकुळे धुळ्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेतून त्‍यांनी राज्‍य सरकारवर निशाणा साधला. ते म्‍हणाले, की भाजपच्या काळात सुरु असलेल्या सर्व योजना या सरकारने बंद केल्या असून राज्य सरकारला फक्त भ्रष्टाचार करण्यात रस असल्याचा घनघात त्यांनी केला आहे.

राज्‍य सरकारमुळेच महागाई

वाढत्या महागाई बद्दल बोलताना म्हणाले की, राज्य सरकार फक्त केंद्र सरकारवर टीका करून नोटंकी करत आहे. मुळात केंद्रापेक्षा जास्त कर राज्य सरकार घेत असल्यानेच महागाई वाढली असल्याचे ते म्हणाले.

Chandrashekhar bawankule
लसीकरण केंद्र दोन दिवस बंद; जळगावात करावी लागतेच प्रतिक्षा

तर मंत्र्यांन राज्‍यात फिरू देणार नाही

राज्य सरकारने ओबीसी आरक्षण घालवले असून राज्यात भाजपचे सरकार असताना काँग्रेसच्या नेत्यांनी कोर्टात जाऊन त्यावर आक्षेप घेतल्याचा गंबीर आरोप देखील त्यांनी केला आहे. डिसेंबरपर्यंत ओबीसीचे आरक्षणाचा मुद्दा राज्य सरकारने न सोडविल्यास राज्याच्या मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नसल्याचा इशारा बावनकुळे यांनी दिला.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com