दहा दिवस उलटूनही धुळेकर पाणीविनाच

दहा दिवस उलटूनही धुळेकर पाणीविनाच
Dhule Corporation
Dhule CorporationSaam tv

धुळे : शहरातील अनेक भागांमध्ये नऊ ते दहा दिवस उलटून देखील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये प्रशासना विरोधात असलेला संताप बघावयास मिळत आहे. ऐन उन्हाळ्यामध्ये नऊ ते दहा दिवसांनंतर देखील पाणीपुरवठा होत नसल्यामुळे (Dhule) धुळेकर नागरिक चांगलेच संतप्त झाले आहेत. (dhule corporation news citizen without water even after ten days)

Dhule Corporation
सुसाईड नोट लिहत महिलेची आत्‍महत्‍या; अज्ञात व्‍यक्‍तीने बदनामी केल्‍याचा उल्‍लेख

लोकप्रतिनिधींकडे वारंवार तक्रारी करूनही नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मार्गी काढण्यास महापालिका प्रशासन (Dhule Corporation) अपयशी ठरले आहे. महापालिका प्रशासनाच्यावतीने नागरिकांना दोन ते तीन दिवसाआड पाणी देण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात तसे चित्र दिसत नाहीये. शहरातील देवपूर भागातील प्रभाग तीनमध्ये असलेल्या लाला सरदारनगरमध्ये नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

अग्निशामक बंबाच्या सहाय्याने पाणी

एकीकडे धुळे महानगरपालिका नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी मोठमोठ्या योजनांच्या वल्गना करीत आहे. मात्र दुसरीकडे नागरिकांना नऊ ते दहा दिवसाआड पाणी मिळत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. नागरिकांनी पाण्यासाठी लोकप्रतिनिधी व महानगरपालिकेला धारेवर धरल्यानंतर अखेर अग्निशामक बंबाच्या सहाय्याने याभागात पाणीपुरवठा करण्यात आला. यावेळी पाणी मिळविण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड उडाल्याचे पाहावयास मिळाले.

तर नागरीक छेडतील आंदोलन

एका अग्निशामक बंबने किती नागरिकांची तहान भागणार असा संतप्त प्रश्न उपस्थित केला जात आहे. येणाऱ्या काळात जर दोन ते तीन दिवस पाणी नागरिकांना मिळाले नाही; तर धुळे महापालिका प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडू अशा संतप्त इशारा नागरिकांनी दिला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com