Dhule: महासभेत दोन डोस घेतलेल्यांना प्रवेशाच्या मुद्यावरून वातावरण तापले

महासभेत दोन डोस घेतलेल्यांना प्रवेशाच्या मुद्यावरून वातावरण तापले
Dhule: महासभेत दोन डोस घेतलेल्यांना प्रवेशाच्या मुद्यावरून वातावरण तापले
dhule corporationsaam tv

धुळे : महानगरपालिकेच्या आज झालेल्या विशेष महासभेमध्ये लसीकरणाच्या मुद्द्यावरून चांगलाच गदारोळ झाला. महासभेदरम्यान काही सदस्यांनी दोन डोस असलेल्यांनाच महासभेमध्ये प्रवेश द्यावा; अशी सूचना महापौरांनी दिली. यावरून नगरसेवक अमीन पटेल यांनी हा मुद्दा अजेंड्यावर का घेण्यात आला नाही? असा मुद्दा उपस्थित करून एकच गोंधळ घातला. (dhule corporation news corona vacciotaon two dose parson entry issue in meet)

dhule corporation
धक्‍कादायक..छेडखानीच्‍या त्रासाने नववीतील मुलीची आत्महत्या

धुळे महापालिकेच्या (Dhule Corporation) सभेत चांगलाच गदारोळ झाल्याचे पाहण्यास मिळाले. लसिकरणाचा मुद्दा जर अजेंड्यावर घेण्यात आला असता तर आम्ही देखील कोरोना संदर्भात दोन डोस (Corona Vaccination) घेतल्याचे सर्टिफिकेट सोबत घेऊन आलो असतो असा मुद्दा नगरसेवक अमीन पटेल यांनी उपस्थित केला. आम्ही मुस्लिम बहुल परिसरात कोरोना लसीकरनाबाबत जनजागृती करून लसीकरणाचे कॅम्प राबविले आहेत. त्यामुळे कोरोनाची लस घेण्यासंदर्भात आम्हाला सुचना न देता हा मुद्दा अजेंड्यावर आणावा; अशा सूचना वजा मागणी केली.

महापौरांची नरमाईची भुमिका

आक्रमक झाले नगरसेवक अमीन पटेल यांनी महापौरांकडे केली. यावरून महापौर प्रदीप करपे (Mayor Pradip Karpe) यांनी नरमाईची भूमिका घेत कोरोनाचे दोन डोस घेतल्याचे सर्वांचे पासेस तपासले जातील असं म्हणून या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु या मुद्द्यावर चांगलाच गदारोळ झाल्यामुळे महासभेचे वातावरण चांगलेच तापले होते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com