गटारीचे पाणी घरात व मंदिरात; संतप्त नागरिकांनी गटारीचे पाणी आणून केला निषेध

गटारीचे पाणी घरात व मंदिरात; संतप्त नागरिकांनी गटारीचे पाणी आणून केला निषेध
Dhule Corporation
Dhule CorporationSaam tv

धुळे : शहरातील प्रभाग क्रमांक 11 मधील विश्वकर्मानगर येथे गटारीचे घाण पाणी पाईप लाईनमध्ये मिसळून नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचत असल्याने पालिका प्रशासनाचा निषेध करण्यासाठी घाण गटारीचे पाणी थेट धुळे महानगरपालिका (Dhule Corporation) आयुक्‍तांच्या कार्यालयातच संतप्त नागरिकांनी आणले. (dhule corporation news dranage water in houses and temples)

Dhule Corporation
मध्‍यरात्री छतावरून पडल्‍याने तरूणाचा मृत्‍यू

या संदर्भात पालिका प्रशासनाला नागरिकांनी गेल्या महिन्याभरापूर्वी देखील निवेदन दिले होते. याबाबत गेल्या महिनाभरापूर्वी निवेदन देताना नागरिकांनी पालिका आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर घाण पाणी फेकून निषेध व्यक्त केला होता. त्यानंतर पालिका प्रशासनातर्फे एका महिन्यात काम मार्गी लावण्याचे आश्वासन देखील देण्यात आले होते. परंतु महिना उलटून देखील पालिका प्रशासनातर्फे कुठल्याही प्रकारचे काम हाती घेण्यात आले नसल्यामुळे संतप्त नागरिकांनी आज पुन्हा धुळे (Dhule) महानगरपालिका आयुक्तांना घेराव घातला आहे.

पावसाळ्यात बिकट प्रश्‍न

पावसाळा (Rain) तोंडाशी आलेला असताना गटारीचे घाण पाणी नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचत असून हिंदू धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या मंदिरामध्ये देखील या गटारीचे घाण पाणी घुसू लागले आहे. येत्या महिन्याभरात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात येऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त करत नागरिकांनी लवकरात लवकर पालिका प्रशासनातर्फे नवीन गटारीचे कामांना मंजुरी द्यावी अशी मागणी केली आहे, अन्यथा जन आंदोलन छेडण्याचा इशारा देखील संतप्त नागरिकांनी पालिका आयुक्तांना दिला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com